मुंबई : मुसळधार पावसात रेल्वे मार्गावरील कल्व्हर्ट (छोटे नाले) भरल्यास रुळांवर अनेकवेळा पाणी तुंबून मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाउन सुरू आहे. यामुळे नालेसफाई, कल्व्हर्ट सफाईसाठी कमी अवधी उरला आहे. या कामाची संयुक्त पाहणी पालिका आणि रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी केली. मात्र पाणी उपसण्याचे पंप रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार २५ मेपर्यंत पुरविण्याचे आदेश आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.रेल्वे परिसरातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा पालिका आयुक्तांनी शुक्रवारी एका विशेष बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पश्चिम रेल्वे) सत्यकुमार आणि शालाब गोयल (मध्य रेल्वे), अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू हेदेखील उपस्थित होते. मुंबईपुढे कोरोनाचे संकट, लॉकडाउन, मजुरांची कमतरता अशा अनेक अडचणी असल्या तरी पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी समन्वयाने पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सादरीकरण केले.बैठकीतील महत्त्वाचे मुद्देमिठी नदीची सफाई तसेच माहिम येथे मिठी नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते, त्या भागाच्या रुंदीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.ब्राह्मणवाडी नाला, कर्वेनगर नाला आणि टिळकनगर नाला यांच्यासह विविध नाल्यांची सफाई.नाली किंवा नदी सफाई करताना सदर ठिकाणी आवश्यकतेनुसार मनुष्यबळाचे नियोजन करून कामे निर्धारित वेळेतच पूर्ण होतील याकडे काटेकोरपणे लक्ष देणे.यासाठी आवश्यकतेनुसार एका पाळीत काम करण्याऐवजी दोन किंवा तीन पाळ्यांमध्ये काम करवून घेण्याची महापालिका आयुक्तांची सूचनाचुनाभट्टी, वडाळा आणि गोरेगाव येथील कल्व्हर्टच्या सक्षमीकरणासह इतर सर्व कल्व्हर्टची सफाई.पाणी उपसा करण्यासाठी ज्या ठिकाणी पंप बसविण्याचे निर्धारित करण्यात आले आहे, त्या सर्व ठिकाणी येत्या २५ मे २०२० पासून पंप बसवावेत.रेल्वे मार्गावरून जाणारे काही पूल महापालिकेद्वारे बांधण्याचे यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने हँकॉक, नाहूर, विद्याविहार, विक्रोळी इत्यादी ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावित असणाºया व महापालिकेद्वारे बांधण्यात येणाºया पुलांचा समावेश आहे. या बांधकामासाठी रेल्वेद्वारे काही परवानग्या आवश्यक आहेत. याबाबतची कार्यवाही करावी.
coronavirus: रेल्वेलगतच्या नदी, नाल्यांची तातडीने सफाई करून घ्या! मध्य, पश्चिम रेल्वेला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 3:55 AM