Coronavirus : ‘तारीख पे तारीख’ बंद ‘करो’ना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:25 AM2020-03-19T07:25:03+5:302020-03-19T07:25:33+5:30

न्यायालयातील गर्दी कमी करण्यासाठी वकिलांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र

Coronavirus: close The 'Tarikh pe Tarikh' | Coronavirus : ‘तारीख पे तारीख’ बंद ‘करो’ना

Coronavirus : ‘तारीख पे तारीख’ बंद ‘करो’ना

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. मात्र तरीही खटल्याची तारीख असलेले अशील, पक्षकार तसेच त्यांचे वकील न्यायालयात ये-जा करीत असल्याने येथे विनाकारण गर्दी वाढतच आहे. परिणामी, विषाणूचा संसर्ग होण्याचा धसका स्थानिक वकील आणि न्यायालय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत या सर्व तारखांना स्थगिती देत त्याची अधिकृत घोषणा करून या जीवघेण्या आजाराविरोधी लढ्यात सहकार्य करावे, अशी विनंती बुधवारी उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांनी पत्राद्वारे मुख्य न्यायमूर्तींना केली आहे.
कोरोनामुळे न्यायालयीन कामकाजाची वेळ कमी करण्यात आली आहे. यातही रिमांड, जामीन अर्जावर सुनावणी, अत्यंत महत्त्वाची प्रकरणे वगळता कोणत्याही प्रकरणावर सध्या सुनावणी होत नाही. मात्र ज्या प्रकरणाची तारीख या महिन्यात आहे त्याच्याशी संबंधित अशील किंवा पक्षकार, त्या प्रकरणात वकीलपत्र घेणाºया वकिलांना न्यायालयात तारीख घेण्यासाठी यावे लागत आहे. त्यामुळे न्यायालयात न्यायनिवाडा होत नसला तरी कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे तसेच अन्य शहरांतून तसेच राज्यांतून फक्त तारखेसाठी न्यायालयात येणाºया लोकांची गर्दी वाढत आहे.
तारखेला हजर न राहिल्यामुळे होणाºया कारवाईला टाळण्यासाठी जीव मुठीत घेऊन लोक प्रवास करीत आहेत. परिणामी, न्यायालयाच्या वेळेत बदल करून गर्दी कमी करण्यासाठी सरकार करीत असलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाचे विधिज्ञ किशोर जोशी यांनी एक पत्र चिफ जस्टिसना लिहिले आहे. यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करीत ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकरणांतील तारखांना स्थगिती दिल्यास विविध राज्यांतून शहरात आणि संबंधित न्यायालयात येणाºया बाहेरच्या लोकांची गर्दी कमी होईल, असे सुचविले आहे.

स्थगिती द्यावी
न्यायालयात येणाºया सामान्य खटल्याच्या निव्वळ तारखा मिळत असून, त्यात फलित काहीच मिळत नाही. बोरीवली ते मुलुंड या १३ सेंटर्सना बंद ठेवत तारखा सरसकट स्थगित केल्यास न्यायालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्यात यश मिळेल.
- किशोर जोशी, विधिज्ञ,
उच्च न्यायालय

Web Title: Coronavirus: close The 'Tarikh pe Tarikh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.