Join us

coronavirus: एमएमआरमधील पालिकांबाबत मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी, वारंवार सूचना देऊनही सुविधा उभारल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 5:59 AM

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर सुविधा उभारा, असे वारंवार सांगूनही एमएमआर क्षेत्रातील पालिकांमध्ये पाहिजे तेवढे काम झाले नाही, या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई : यापूर्वी पालिकांतील काही अधिकारी बदलले; कारण ते कार्यक्षम नव्हते असे नाही. पण, आता कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होते आहे. अशावेळी सर्वांच्या समन्वयातून काम करा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर सुविधा उभारा, असे वारंवार सांगूनही एमएमआर क्षेत्रातील पालिकांमध्ये पाहिजे तेवढे काम झाले नाही, या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. कोरोनची लढाई लढण्यासाठी नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करून घ्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन आढावा घेत महत्त्वाच्या सूचना केल्या.येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरू करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांचीही मदत घ्या. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा साठा करून ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.दक्षता समित्या नेमाकोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीज्मध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का? तसेच त्यांची आॅक्सिजन पातळी बरोबर आहे का? परिसरात कुणाला काही आजार आहेत का? लोक मास्क घालतात का? या तसेच इतर अनेक बाबतींत या नागरिकांच्या समित्यांची आपणास मदत होईल. मुंबईत २०१० मध्ये मलेरिया, डेंग्यूच्या वेळी वस्त्यावस्त्यांत लोकांच्या मदतीने फवारणी केली होती.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे