मुंबई - राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत (Coronavirus in Maharashtra) असताना कोरोनाचा विषाणू आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काल रात्री रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्या घरीच क्वारेंटाइन झाल्या आहेत. (CM Uddhav Thackeray's wife Rashmi Thackeray Tested corona positive )
रश्मी ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून, त्या घरीत क्वारेंटाइन झाल्या आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. रश्मी ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना शनिवारी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर आता रश्मी ठाकरेंनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.