Join us

Coronavirus: मोनोक्लोनल एन्टीबॉडीजची किंमत कमी करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना बैठकीत विनंती     

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 5:42 PM

Uddhav Thackeray News: मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे सध्या कोविड उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र त्याची  किंमत ५० ते ६० हजार प्रती डोस असून तिसऱ्या लाटेत  ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील. 

- मनोहर कुंभेजकरमुंबई : मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे सध्या कोविड उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र त्याची  किंमत ५० ते ६० हजार प्रती डोस असून तिसऱ्या लाटेत  ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील. याचा विचार करून  केंद्र सरकारने या औषधांवर किंमतीचे निर्बंध आणून त्याची सहज उपलब्धता होईल हे पाहावे अशी विनंती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली. केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री सदर मागणी केली. या संदर्भात राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी खर्चिक असलेली मोनोक्लोनल अँटीबॉडीजची किंमत कमी करण्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. तर लोकमतने दि,28 जूनच्या अंकात यासंदर्भात वृत्त देऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

गेली दिड वर्षे सतत कोविड सेंटर, पालघर,ठाणे ग्रामीण,मुंबई येथे जाऊनही त्यांना पहिल्या लाटेत  कोविडचा संसर्ग झाला नाही.पण दि,16 जानेवारी व दि,16 फेब्रुवारी रोजी कोविड प्रतिबंधक पहिला व दुसरा डोस घेऊन सहा महिने पूर्ण होतांना दि,17 जून रोजी कोविड पॉझिटिव्ह झालो अशी माहिती त्यांनी दिली.

अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन आणि त्यांच्या सूचनेवरून आपल्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या गेल्या.आणि याचा सकारत्मक परिणाम होऊन लवकर कोरोनामुक्त झालो अशी माहिती त्यांनी दिली.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज या कृत्रिम अँटीबॉडीज असून कोविड रुग्णाची प्रतिकार शक्ति वाढवून त्या कोरोनावर लवकर मात करतात.तसेच मोनोक्लोनल अँटीबॉडीजमुळे कोविड रुग्णाला रॅमिडिसिव्हर तसेच स्टिरॉइड्स देण्याची तशी आवश्यकता भासत नाही आणि विशेष म्हणजे रुग्ण लवकर बरा होतो. येणाऱ्या संभाव्य कोविडच्या  तिसऱ्या लाटेत मोनोक्लोनल अँटीबॉडीज वेळीच रुग्णाला दिल्यास आपण निश्चित तिसरी लाट थोपवू शकतो असा डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीकोरोना वायरस बातम्या