मुंबई : कोरोनाची दहशत सर्वत्र पसरल्यानंतर घशात खवखव झाली किंवा एखादी शिंक जरी आली तरी औषधांचा मारा करण्यास बहुसंख्य लोकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे मेडिकल दुकानांमध्ये क्लोरोक्वीन, एजिथ्रोमायसी आणि पॅरासिटामोल या औधषांची मागणी जवळपास दुपटीने वाढल्याची माहिती हाती आली आहे. नजिकच्या काळात या औषधांची गरज भासू शकते या भितीपोटी साठवणूकही सुरू झाल्याचा संशय आहे.मलेरिया आजारात वापरले जाणारे क्लोरोक्वीन हे औषध कोरोनावरील उपचारांवर प्रभावी ठरत असल्याचेमेजेस समाजमाध्यमांवर पसरले आहेत. सर्दी, खोकला झाला की डॉक्टरांकडून सर्वसाधारणपणे अॅजिथ्रोमायसीन दिले जाते. तर, डोकेदुखी, अंगदुखी आणि तत्सम आजारांवर पॅरासिटामोलची मात्रा दिली जाते. हीच सर्वसाधारण लक्षणे कोरोनासाठी देण्यात आलेली आहेत. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा प्रचंड धसका प्रत्येकानेच घेतला आहे. त्यामुळे किरकोळ सर्दी खोकला झाला तरी डॉक्टरांच्या सल्ला न घेताच या औषधांचे सेवन अनेकांकडून होत असल्याचे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे. प्रमाणापेक्षा जास्त या औषधांची मागणी वाढल्यानंतर डॉक्टरांची चिठ्ठी असल्याखेरीज औषध देणार नाही अशी भूमिका घेतल्याचे ठाण्यातील नोबेल केमिस्टच्या व्यवस्थापकांनी सांगितले.अनावश्यक मारा आणि साठा नकोकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानेच सतर्क रहायला हवे. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. मात्र, भितीच्या सावटाखाली अनावश्यक औषधांचा मारा करणेही योग्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यायला हवीत. तसेच, नजिकच्या काळात या औषधांची गरज लागेल म्हणून त्यांचा साठा करणेही योग्य नसल्याचे मत डॉ. संतोष जोशी यांनी व्यक्त केले.
Coronavirus : सर्दी खोकल्याच्या औषधांची साठवणूक ?, पॅरासिटामोलला प्रचंड मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 2:13 AM