Coronavirus: देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र शिजतंय; संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:36 PM2020-04-23T12:36:57+5:302020-04-23T12:39:26+5:30

राजकारण, मतभेद असू शकतात पण मतभेद अशाप्रकारे व्यक्त करणे, लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करत आहेत, यासाठी कोणी परकीय शक्ती तुम्हाला वापरून घेत आहे का?

Coronavirus: Conspiracy to create religious rift in the country claim by Shiv sena MP Sanjay Raut pnm | Coronavirus: देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र शिजतंय; संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले...

Coronavirus: देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र शिजतंय; संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देवांद्र्याची घटना राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठरवून केलेली आहे.देशात तेढ निर्माण करण्यासाठी कोणी परकीय शक्ती तुम्हाला वापरून घेत आहे का?शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली शंका

मुंबई - सोनिया गांधी यांच्याबद्दल राजकीय मतभेद असू शकतात पण ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टिपण्णी केली जात आहे यामागे काहीतरी षडयंत्र शिजतंय. देशात सामाजिक विष पेरण्याचं काम केलं जात आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा डाव दिसत आहे. लोकांनी संयम पाळणं गरजेचे आहे. कोरोनापेक्षा भयंकर हे विष आहे असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, राजकारण, मतभेद असू शकतात पण मतभेद अशाप्रकारे व्यक्त करणे, लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करत आहेत, यासाठी कोणी परकीय शक्ती तुम्हाला वापरून घेत आहे का? वांद्र्याची घटना राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठरवून केलेली आहे. पालघरमध्ये साधूच्या वेशात मुलांना पळवणारी टोळी फिरतेय असा मॅसेज पसरवणारे कोण? पालघर घटनेनंतरही राज्यात दोन धर्मात तेढ निर्माण झालं नाही त्यामुळे या लोकांचा संताप वाढलेला आहे अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली. मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी हे सांगितलं आहे.

तसेच एखादा गुन्हा घडतो तो सरकारच्या इशाऱ्यावर घडत नाही, उत्तर प्रदेशात जे घडलं तेव्हा योगी आदित्यनाथ यांना विचारुन झालं का? २ साधूंची हत्या झाली हे दुर्दैवी आहे. आधीच्या सरकारच्या काळात सामूहिक हत्या झाली तेव्हाही आम्ही राजकारण करु नये असं सांगत होतो आणि आत्ताही सांगत आहोत. विरोधी पक्षाचं कार्यालय राजभवनाच्या दारात आहेत का? प्रत्येक गोष्ट राज्यपालांना जाऊन सांगतात. राज्य बदनाम आणि अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, २७ तारखेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाचे सदस्य नसतील यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत ते अजून झोपेत आहे. २८ तारखेनंतरही हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम काम चालेल असा विश्वास आहे. कोणतंही सरकार राज्यपाल चालवू शकत नाही, मंत्रिमंडळाच्या शिफारशी स्वीकारणं हे घटनात्मक बंधनकारक आहे. कारण लोकनियुक्त हे सरकार आहे. राजकीय पेच निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे पण घटनेचा पेच नाही. हे सरकार टिकवणं राज्यपाल आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे असाही टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

Web Title: Coronavirus: Conspiracy to create religious rift in the country claim by Shiv sena MP Sanjay Raut pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.