Join us

coronavirus: ‘ती’ वादग्रस्त टिप्पणी अखेर केली रद्द, क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 6:39 AM

जिल्हाधिकारी बैठकीच्या व्हायरल झालेल्या टिप्पणीमुळे जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने ही बैठक घेतली.

मुंबई / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे गणेशोत्सवास यायचे असेल तर ७ आॅगस्टपूर्वी या. नंतर जिल्ह्यात प्रवेश नाही. पाच हजार दंड घेऊ, अशा प्रकारची व्हायरल झालेली टिप्पणी रद्द केल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांवरून १० दिवसांचा करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी, अशीही आमची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम अ‍ॅपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. या वेळी राऊत म्हणाले, गणेशोत्सव व मोहरम हे दोन सण शांततेत पार पडावे यासाठी पालकमंत्री सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक झाली. या वेळी सर्वांनी क्वारंटाइन कालावधी ७ दिवसांचा करण्यासाठी राज्य सरकारने कोकणसाठी खास बाब म्हणून केंद्राच्या आरोग्य विभागाकडे मागणी करावी. ती मान्य झाल्यावर येणारे चाकरमानी सात दिवस क्वारंटाइन राहतील. त्यानंतर ३ दिवस गर्दीत मिसळणार नाहीत, अशी नवी नियमावली बनविण्याच्या सूचना केल्या आहेत. चाकरमान्यांना ई-पास देण्यासाठी प्रयत्न करावे, यायच्या ४८ तास आधी त्यांची कोरोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत किंवा एक हजारांत चाचणी उपलब्ध करावी, टोलमाफी द्यावी आदी मागण्याही करण्यात आल्या. सर्व मागण्या जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासनाकडे पाठविणार आहेत.लवकरच स्पष्टता येईलजिल्हाधिकारी बैठकीच्या व्हायरल झालेल्या टिप्पणीमुळे जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने ही बैठक घेतली. या वेळी जिल्ह्याचा विचार करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यावर निर्माण झालेला संभ्रम दूर होऊन लवकरात लवकर स्पष्टता येईल, असे राऊत यांनी सांगितले.भाजप नेत्यांचा सरकारवर निशाणादरम्यान, यावरून भाजप नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. ‘कोकणी माणसाला कोकणात यायला बंदी’, अशी भूमिका घेता येणार नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे म्हणाले. गणेशोत्सवासारख्या कोकणासाठी अतिमहत्त्वाच्या वेळी चाकरमानी कोकणात येतात. त्यांना आता कोरोनाच्या नावाखाली अडवता येणार नाही, असे ते म्हणाले होते. तर, जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून चाकरमान्यांची कोंडी करण्याची योजना तयार केली जात असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरससिंधुदुर्गरत्नागिरीविनायक राऊत