मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली, तरी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. या सेवेचा मोठा दिलासा अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांना मिळत आहे. मात्र दररोज शेकडो लोकांच्या संपर्कात येणा-या बेस्टच्या कर्मचा-यांना कोरोनाचा धोका वाढतो आहे. बेस्टच्या तब्बल १४ कर्मचा-यांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी २४ मार्चपासून मुंबईत रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र पाणी, वीजपुरवठा, आरोग्य अशा अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने यासाठी काम करणाºया कर्मचाºयांना बेस्ट उपक्रमाने मोठा दिलासा दिला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३१०० बसगाड्या आहेत. यापैकी दररोज सरासरी १३०० बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत.मात्र यामुळे बसवाहक आणि चालकांना कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. आतापर्यंत सात बसवाहक, चार बसचालक, विद्युत विभागातील एक, परिवहन अभियांत्रिकी विभागातील दोन कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या २३६ कर्मचाºयांना क्वारंटाइनकरण्यात आले आहे. यापैकी कोरोनाची लक्षणे न आढळलेले शंभर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.परळ येथील बेस्ट वसाहतीत राहणाºया बसवाहकाची मुलगी, जावई आणि नातीला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे ते राहत असलेल्या इमारतीत प्रवेश बंद करण्यात आला. मात्र त्या वाहकाची पत्नी, मुलगा आणि त्याचा स्वत:चा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.>१५ कर्मचारी क्वारंटाइनगोरेगाव आगारातील एका वाहकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्याबरोबरच काम करणाºया १५ कर्मचाºयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.बेस्ट उपक्रमाच्या काही बसगाड्या गरजू, बेघरांना अन्नदान करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. तसेच आतापर्यंत सात मिनी वातानुकूलित बसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे.अशा एकूण २० बसगाड्या कोरोनाचे संशयित रुग्ण अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
Coronavirus : बेस्ट उपक्रमातील १४ कर्मचाऱ्यांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:37 AM