Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरच्या ३ पोलिसांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 03:21 PM2020-05-02T15:21:00+5:302020-05-02T15:23:42+5:30
‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या तिघांनाही सांताक्रुझमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 11 हजारपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत लढणारे पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, मातोश्रीबाहेरील आणखी तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या वांद्र्यातील ‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या तिघांनाही सांताक्रुझमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
मातोश्री बंगल्याजवळ बंदोबस्तवर असलेल्या तीन पोलिसांना कोरोनची लागण झाल्याची माहिती आहे. यातील दोघांनी रात्रपाळी करून शुक्रवारी घर गाठले तर एकजण सकाळी ड्युटीवर रुजू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. लोकल अर्म्स विभागातून ते बंदोबस्त करण्यासाठी याठिकाणी आले होते. सुरक्षेचे उपाय म्हणून आम्ही त्यांची कोरोना चाचणी करून घेतली होतो. त्या अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले. त्यानुसार आम्ही त्यांना सांताक्रूझमध्ये क्वॉरंटाइन केल्याची माहिती परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिली.
यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. दरम्यान, मातोश्रीवरील चहावाला कोरोनावर मात करुन नुकताच परतला आहे. मात्र आता ‘मातोश्री’बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने मातोश्रीनजीकच्या परिसरात अधिक दक्षता घेतली आहे.
Coronavirus : दिलासादायक! उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीजवळ तैनात १७० सुरक्षा रक्षकांचे अहवाल निगेटीव्ह
बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको
Coronavirus : व्हॉट्स अॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून
राज्यभरात 300 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोना तर तिघांचा मृत्यू
राज्यभरात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 342 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. यापैकी 49 जणांना डिस्चार्ज दिला आहे तर 290 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. कोरोना लागण झालेल्यांमध्ये 30 अधिकारी आणि 197 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यापैकी 8 पोलीस अधिकारी आणि 22 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.