Coronavirus: कोरोनाने एसटीचे चाक रोखले; अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ५०० बसेस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 04:46 AM2020-03-23T04:46:11+5:302020-03-23T04:46:43+5:30

कोरोनामुळे एसटीच्या ११ मार्च ते २० मार्च या दरम्यान राज्यभरातील ९३ हजार १८० फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे एसटीला १४ कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

Coronavirus: Corona blocked wheel of ST; Two buses will run to provide essential services | Coronavirus: कोरोनाने एसटीचे चाक रोखले; अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ५०० बसेस धावणार

Coronavirus: कोरोनाने एसटीचे चाक रोखले; अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ५०० बसेस धावणार

Next

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्वसामान्य प्रवासासाठी ३१ मार्चपर्यंत एसटी महामंडळाकडून एकही बस सोडली जाणार नाही, पण अत्यावश्यक सेवेसाठी एसटीच्या ५०० बसेस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
रेल्वे मंडळाने देशातील सर्व उपनगरीय लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, एसटी महामंडळानेही बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी धावणारी एसटी बंद असली, तरी शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी ५०० एसटीच्या बसेस धावणार आहेत.
कोरोनामुळे एसटीच्या ११ मार्च ते २० मार्च या दरम्यान राज्यभरातील ९३ हजार १८० फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे एसटीला १४ कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी
एसटीची मदते
सरकारने अत्यावश्यक सेवा देणाºया व्यक्तींसाठी वाहतूक करण्याची जबाबदारी एसटी महामंडळ आणि बेस्टवर टाकली आहे. त्यानुसार, पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकांहून मुंबईतील बोरीवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यंत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.) केवळ अत्यावश्यक सेवा देणाºया लोकांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या बसेस दर पाच मिनिटाला याप्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.
पनवेल-वाशी, पनवेल-दादर, पालघर-बोरीवली, विरार-बोरीवली, वाशी-दादर, आसनगाव-ठाणे, कल्याण-ठाणे, कल्याण-दादर, बदलापूर-ठाणे, नालासोपारा-बोरीवली या मार्गांवर अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एसटी बसेस धावतील. या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील सर्व एसटी बसेस राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद होणार आहेत.


बेस्टच्या खास सेवा
मुंबई : कोरोनाला आळा घालण्यासाठी आता मुंबई ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहे. या काळात मुंबईची लोकल पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, मुंबईला अत्यावश्यक सेवा देत असलेल्या कर्मचारी वर्गास कामावर हजर राहता यावे, यासाठी बेस्ट सरसावली आहे. संपूर्ण काळात बेस्ट वाशी, बोरीवली, गोराई डेपो, ओशिवरा डेपो, गोरेगाव, दहिसर, दिंडोशी, शिवाजीनगर, शिवडी, बॅकबे डेपो, आगरकर चौक आणि मुलुंड येथून बेस्ट सेवा देणार आहे. काही अडचण असल्यास १८००२२७५५० या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. दरम्यान, रविवारी बेस्टकडून मुंबईच्या रस्त्यांवर १ हजार २५३ बसेस चालविण्यात आल्या, अशी माहिती बेस्टने दिली.

Web Title: Coronavirus: Corona blocked wheel of ST; Two buses will run to provide essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.