मुंबई : मुंबईतील कोरोनाचा कहर आता खाकी वर्दीवाल्याच्या घरात शिरला आहे.भायखळा पोलीस वसाहतीत एक पॉजिटीव्ह रुग्ण आढळल्याने पूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.बिल्डिंगमध्ये रहात असलेले अंमलदार व अधिकारी यांना नोकरीच्या ठिकाणी न जाण्याची सूचना केली आहे.याप्रकारामुळे संबंधित अधिकारी, अंमलदार आणि त्याच्या कुटूंबीयाच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग इतर कोणाला होऊ नये,यासाठी पूर्ण वसाहत 'क्वारंटाटाईन झोन' करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दक्षिण मुंबईतील मध्य व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या भायखळा पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलिसांचा सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यानुसार तातडीने त्याच्या संपर्कात असलेल्या पोलिसांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्याचबरोबर त्या इमारती रहात असलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आले. सर्वांना घरात थांबून रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणालाही वसाहतीमध्ये जाता येऊ नये, म्हणून पूर्ण इमारत सील केली. त्याचप्रमाणे तेथे रहात असलेले विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार यांना त्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी जाता येणार नाही, याची नोंद भायखळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तेथून संबंधित ठिकाणी निरोप दिला जाणार आहे.
खबरदारीसाठी वसाहत सीलकोरोनाचाची बाधा इतरांना होऊ नये, व्हायरस पसरु नये यासाठी भायखळा पोलीस वसाहत सील केली आहे. संबंधितानी घाबरण्याचे कारण नाही,त्यांच्या सुरक्षची जबाबदारी घेण्यात येत आहे. - प्रणव अशोक (पोलीस उपयुक्त प्रवक्ते )