Coronavirus: पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आता 207; तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के पश्चिममध्ये 43 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 04:47 PM2020-04-08T16:47:05+5:302020-04-08T16:47:27+5:30

तर मालाड पश्चिम मढ जेट्टी ते थेट दिंडोशीच्या मालाड पूर्व कुरारपर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या आणि 10 लाख लोकसंख्या असलेल्या पी उत्तर वॉर्डमध्ये कोरोनाचे 32 रुग्ण आहेत.

Coronavirus: Corona figures in western suburbs now 207; Corona's hotspot was 43 patients in K West | Coronavirus: पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आता 207; तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के पश्चिममध्ये 43 रुग्ण

Coronavirus: पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आता 207; तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के पश्चिममध्ये 43 रुग्ण

Next

मनोहर कुंभेजकर
मुंबई- पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढत आहे.के पश्चिम हा सुमारे 5 लाख 80 हजार लोकसंख्या असलेला विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिमपर्यंत पसरलेला मोठा वॉर्ड आहे. पालिकेच्या नकाश्यावर हा कोरोनाचा हॉट स्पॉट असून येथे कोरोनाचे तब्बल 43 रुग्ण आहेत. त्या खालोखाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मोडत असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 33 रुग्ण आहेत. तर मालाड पश्चिम मढ जेट्टी ते थेट दिंडोशीच्या मालाड पूर्व कुरारपर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या आणि 10 लाख लोकसंख्या असलेल्या पी उत्तर वॉर्डमध्ये कोरोनाचे 32 रुग्ण आहेत.

त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करायचा याकडे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, 3 पालिका उपायुक्त, 9 सहाय्यक पालिका आयुक्त, 9 वॉर्डचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र आपले 100 टक्के योगदान देऊन मोलाची भूमिका बजावत असल्याचे येथील चित्र आहे.

वांद्रे ते दहिसर पूर्व व पश्चिम भागात विस्तीर्ण पसरलेल्या पश्चिम उपनगराची गणना होते. पश्चिम उपनगरात काल कोरोनाचे 191 पॉझिटिव्ह रुग्ण होते, तर आज येथे कोरोनाचे 207 रुग्ण झाले आहेत. पालिकेच्या वॉर्ड विभागणीनुसार पश्चिम उपनगरात एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर असे एकूण 9 वॉर्ड येतात. पश्चिम उपनरातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून के पश्चिम वॉर्ड असून यामध्ये कोरोनाचे 43 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्या खालोखाल एच पूर्व मध्ये 33, पी उत्तर वॉर्ड मध्ये 32, एच पश्चिममध्ये 17,के पूर्वमध्ये 27,आर दक्षिणमध्ये 17, पी दक्षिणमध्ये 17, आर मध्यमध्ये 13 व आर उत्तर मध्ये 8 असे एकूण पश्चिम उपनगरात कोरोनाचे 207 रुग्ण झाले आहेत.

Web Title: Coronavirus: Corona figures in western suburbs now 207; Corona's hotspot was 43 patients in K West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.