Coronavirus: मुंबईच्या पंचतारांकित 'ताज' हॉटेलमधील 6 जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 07:10 AM2020-04-12T07:10:52+5:302020-04-12T07:12:10+5:30

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठीी अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते.

Coronavirus: Corona infection infects 6 people in Mumbai's five-star Taj Hotel | Coronavirus: मुंबईच्या पंचतारांकित 'ताज' हॉटेलमधील 6 जणांना कोरोनाची लागण

Coronavirus: मुंबईच्या पंचतारांकित 'ताज' हॉटेलमधील 6 जणांना कोरोनाची लागण

googlenewsNext

मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी टाटा समुहाने कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ताज हॉटेलचे दरवाजे खुले केले होते. ताज ग्रुपच्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, आता ताज हॉटेलमधील 6 कर्मचारीच कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटीव्ह आढळले आहेत. कोणामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, याचा शोध सुरू असून सर्व कर्मचाऱ्यावर  बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठीी अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते. त्यामुळे समुहाने हा निर्णय घेतला आहे. कुलाबा येथील हॉटेल ताज महल, बांद्र्यातलं ताज लँड्स, सांताक्रुजमधलं हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट या हॉटेल्समध्ये डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी या खोल्या देण्यात येणार आहेत. प्रशासन आणि सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. मुंबईत आधीच जागेची कमतरता असते. त्यामुळे त्यांची सोय कुठे करायची याची चिंता प्रशासनाला होती. मात्र, टाटा ग्रुपच्या या निर्णयामुळे मोठी चिंता दूर झाली होती. प्रशासन आणि सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरला होता. मात्र, ताज हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.  हे आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र कोरोना बाधित रुग्णसेवा करत आहेत. त्यातूनच त्यांना हा संसर्ग झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आता, या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण नेमकी कोणापासून झाली, याचा शोध सुरू असून सर्व कर्मचाऱ्यावर  बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला होता. त्यासाठी नुकतेच टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल दिड हजार कोटींची मदत देणार असल्याचं जाहीर केली आहे. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असेही रतन टाटांनी म्हटले होते.

Web Title: Coronavirus: Corona infection infects 6 people in Mumbai's five-star Taj Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.