Coronavirus: लॉकडाऊन केलेल्या ऑर्थर रोड कारागृहातील कैद्याला कोरोना; दोन पोलिसांनाही लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:08 AM2020-05-07T08:08:18+5:302020-05-07T08:08:31+5:30
भायखळा कारागृहातील गेस्टहाउस क्वॉरंटाइन्
मुंबई : लॉकडाउन केलेल्या ऑर्थर रोड कारागृहातील एका कैद्याला कोरोनाची लागण झाली आहे, तसेच कारागृहाबाहेर तैनात असलेल्या दोन पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. या दोघांना भायखळा कारागृहाच्या गेस्टहाउसमध्ये ठेवण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील कारागृहे लॉकडाउन करण्याचा निर्णय ९ तारखेला शासनाने घेतला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह,
भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाउन करण्यास सांगितले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आतील कैद्यांची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयापासून काही पावलांवर असलेल्या ऑर्थर रोड कारागृहातील
एका कैद्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याची ने-आण करणाऱ्या दोन पोलिसांना भायखळा कारागृहाच्या गेस्टहाउसमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तेथील अधिकाऱ्यांनी विरोध केला होता.
मात्र, कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी येथील विश्रामगृहात बाहेरून येणाºया कर्मचाºयांना राहण्यास द्यावे, असे आदेश दिले. त्यामुळे या दोन पोलिसांना येथे ठेवण्यात आले होते. नुकतेच त्या दोन पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार दोघांवर उपचार सुरू असून गेस्टहाउस क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाºयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कैदी कमी करणे गरजेचे
८००ची क्षमता असलेल्या कारागृहात २८०० कैदी आर्थर रोड कारागृहात २८०० कैदी आहेत. ८०० ची क्षमता असलेल्या कारागृहात कैदी एकेमकांच्या अंगावर झोपत आहे. अशात फिझिकल डिस्टन्सिंगचा कोणी विचार करत नाही. कारागृह अधिक्षकाकडून कैद्यांसाठी
शक्य तेवढी सर्व काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे आधी कैदी कमी होणे गरजेचे आहे. याबाबत शासनाकडे पत्रव्यवहारही केला. मात्र, काहीही निष्पन्न झाले नसल्याचे अधिकाºयाकडून सांगण्यात आले. कोरोना हा विषाणू आहे. त्यामुळे येथील कैदी कमी करणे गरजेचे असल्याचेही अधिकाºयाने नमूद केले.
गैरसोय होत असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी
कारागृहातील कर्मचाºयांची राहण्यासह शौचालयाचीही गैरसोय होत आहे. एक किंवा दोन शौचालये ४० ते ५० कर्मचारी वापरत असल्याने याचा फटका त्यांच्या आरोग्यावर बसत आहे. त्यामुळे त्यांचीही वेळीच चाचणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, असा सूर येथील कर्मचाºयांमध्ये आहे.