coronavirus : कोरोनाचा प्रकोप, दिवसभरात राज्यात ४६६ नव्या रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:55 PM2020-04-20T20:55:35+5:302020-04-20T21:02:37+5:30

राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली असून त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत.

coronavirus: Corona outbreak in state, diagnosed in 466 new patients in the state throughout in the day | coronavirus : कोरोनाचा प्रकोप, दिवसभरात राज्यात ४६६ नव्या रुग्णांचे निदान

coronavirus : कोरोनाचा प्रकोप, दिवसभरात राज्यात ४६६ नव्या रुग्णांचे निदान

Next
ठळक मुद्देराज्यातील मेट्रो शहरांतील रुग्णसंख्येत चिंताजनक वाढएकूण रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वरसोमवारी ९ मृत्यूंची नोंद, बळींचा आकडा २३२

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत असून मेट्रो शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली असून त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. तर मुंबईतही सोमवारी १८७ रुग्णांचे निदान झाले असून त्यामुळे मुंबईची रुग्णसंख्या ३ हजार ३२ वर पोहोचली आहे. तर मुंबईत बळींचा आकडा १३९ झाला आहे.

सोमवारी राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी सहा पुरुष तर तीन महिला आहेत. या मृत्यूंपैकी ६० वर्ष किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत. तर एक रुग्ण वय वर्ष ४० ते ६० वयोगटातील आहेत व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्यूमुखींपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. उर्वरित सात जणांपैकी पाच रुग्णांमध्ये ७१ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सोमवारी ६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर आजपर्यंत राज्यातून ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक घरगुती अलगीकऱण असून ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर राज्यात सध्या ३६४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून सोमवारी एकूण ५६४८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २१८५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

चिंताजनक !  राज्यात ८१ टक्के रुग्ण लक्षणविरहित

राज्यातील २ हजार ३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १ हजार ८९० म्हणजेच ८१ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर १७ टक्के म्हणजे ३९३ रुग्णांना लक्षणे असल्याचे दिसून आले आहे.या रुग्णांपैकी ५३ रुग्ण म्हणजेच दोन टक्के हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

Web Title: coronavirus: Corona outbreak in state, diagnosed in 466 new patients in the state throughout in the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.