Join us

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईत आता २८ दिवसांनी कोरोनाबाधित दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 2:00 AM

दहिसरमध्ये मात्र १३ दिवसांत डबल; हॉटस्पॉट भागातही रुग्णसंख्या नियंत्रणात

मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण मुंबईत आता २८ दिवसांवर पोहोचले आहे. २४ प्रशासकीय विभागांपैकी १८ विभागांत रुग्ण दुप्पट होण्यास २० दिवस व त्याहून अधिक कालावधी लागत आहे. तर दररोज रुग्ण वाढण्याचे प्रमाणही आता मुंबईत सरासरी २.४२ टक्क्यांवर आले आहे. आता केवळ दहिसर विभागात १३ दिवसांनी रुग्ण दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी राज्य सरकारने मे महिन्यात आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच पालिका प्रशासनाने ‘चेसिंग द वायरस’ ही मोहीम सुरू केली. त्यामुळे जून महिन्यात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २० वरून २४ दिवसांवर पोहोचले. या आठवड्यात हे प्रमाण आणखी वाढत आता २८ दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भायखळा, धारावी, सायन-वडाळा आणि गोवंडी-मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. माटुंगा एफ उत्तर विभागात तर ६२ दिवसांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे समोर आले आहे.कोरोनावर नियंत्रणपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेच्या माध्यमातून एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाइन करणे, रुग्णांवर दर्जेदार उपचार, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणाºया साहाय्यक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या