CoronaVirus News: क्या बात है! कोरोनानं त्रासलेल्या मुंबईकरांना डबल दिलासा; आकडेवारीमुळे सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 22:23 IST2020-07-22T22:11:58+5:302020-07-22T22:23:00+5:30
CoronaVirus News: मुंबईत ७५ हजार ११८ रुग्ण कोरोनामुक्त; तर २३ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू

CoronaVirus News: क्या बात है! कोरोनानं त्रासलेल्या मुंबईकरांना डबल दिलासा; आकडेवारीमुळे सुखद धक्का
मुंबई- मुंबईत बुधवारी १ हजार ३१० कोरोना रुग्णांची आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या १ लाख ४ हजार ६७८ तर बळींचा आकडा ५ हजार ८७५ झाला आहे. सध्या २३ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर ७५ हजार ११८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर ७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५९ दिवसांवर पोहोचला आहे. कोरोना विषाणूमुळे मुंबईत बुधवारी ५८ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४८ रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३७ पुरुष तर २१ महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतून दिवसभरात १५६३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ६३९ चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषीत करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच ६ हजार १०० इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी ४ लाख ५० हजार ४५९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
धोका वाढला! राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं विक्रम मोडला