CoronaVirus News: मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर ८७ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:52 AM2020-08-14T03:52:15+5:302020-08-14T06:49:24+5:30
मुंबईत १२ ऑगस्टपर्यंत कोविडच्या ६ लाख २९ हजार ८९९ चाचण्या झाल्या. मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णनोंदीत वाढ झाली आहे. दिवसभरात १२०० रुग्ण आढळले असून ४८ मृत्यू झाले आहेत.
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्के असून रुग्ण दुपटीचा दर ८७ दिवसांवर गेला आहे. ६ ते १२ आॅगस्टपर्यंत शहर, उपनगरात एकूण कोविडवाढीचा दर ०.८० टक्के आहे.
मुंबईत १२ ऑगस्टपर्यंत कोविडच्या ६ लाख २९ हजार ८९९ चाचण्या झाल्या. मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णनोंदीत वाढ झाली आहे. दिवसभरात १२०० रुग्ण आढळले असून ४८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख २७ हजार ५५६ झाली असून बळींचा आकडा ६ हजार ९९१ झाला आहे. मुंबईत १ लाख ९५४ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या १९,३१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ४८ मृत्यूंमधील ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३० रुग्ण पुरुष व १८ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी चार जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ३५ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते, तर उर्वरित नऊ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.