Coronavirus: धक्कादायक! दाटवस्तीत कोरोनाचा फैलाव वेगात; धारावीत २४ तासांत २६ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:14 PM2020-04-16T22:14:06+5:302020-04-16T22:14:51+5:30
वरळी पाठोपाठ धारावी परिसरात ही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे.
मुंबई - धारावी परिसरात गेल्या २४ तासांमध्ये कोरोना ग्रस्त २६ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावी परिसरातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या आता ८६ वर पोहचली आहे. घरोघरी जाऊन तपासणी सुरू केल्यामुळे या रुग्णांपर्यंत पोहचणे शक्य झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.
वरळी पाठोपाठ धारावी परिसरात ही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. दाटीवाटीने वसलेल्या या देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत प्रभावी क्वारंटाईन शक्य नसल्याने संशयित व्यक्तींची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जात आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या सोशल नगर, मदिना नगर, शास्त्री नगर, जनता नगर अशा परिसरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या क्षेत्रांमध्ये जाऊन पालिकेचे विशेष पथक तेथील लोकांची तपासणी करीत आहेत. यापैकी ताप, सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी साई रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.
धारावीत घरोघरी कोरोना रुग्णांचा शोध पालिका व खासगी डॉक्टर, नर्स यांचे पथक घेत आहेत. त्यामुळे एका दिवसात २६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर लक्ष्मी चाळ येथील ५८ वर्षीय एका व्यक्तीच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या २६ रुग्णांमध्ये मुस्लिम नगरमधील ११ , मुकुंद नगरमधील -४, सोशियल नगर - २, राजीव नगर -२, साईराज नगर, ट्रान्झिस्ट कॅम्प, रामजी चाळ, जनता सोसायटी, सूर्योदय सोसायटी, शिवशक्ती नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
कोरोनाचे रुग्ण...८६ रुग्ण....९ मृत्यू..
डॉ. बालिगा नगर - पाच रुग्ण ( तीन मृत्यू)
वैभव इमारत, धारावी मुख्य रस्ता.. दोन रुग्ण
मकुंद नगर झोपडपट्टी - १८ रुग्ण
मदिना नगर ...दोन रुग्ण
धनवडा चाळ - एक रुग्ण
मुस्लिम नगर - १८ रुग्ण (एकाचा मृत्यू)
सोशल नगर - आठ रुग्ण (एकाचा मृत्यू)
जनता सोसायटी . आठ रुग्ण
कल्याण वाडी - चार रुग्ण (दोन मृत्यू)
पी एम जी पी कॉलनी ....एक रुग्ण
मुर्गुन चाळ... दोन रुग्ण
राजीव गांधी चाळ... चार रुग्ण
शास्त्री नगर - चार रुग्ण
नेहरू चाळ (एक मृत्यू)
इंदिरा चाळ - एक रुग्ण
गुलमोहर चाळ - एक रुग्ण
साई राज नगर - एक रुग्ण
ट्रान्झिस्ट कॅम्प - एक रुग्ण
रामजी चाळ - एक रुग्ण
जनता सोसायटी - एक रुग्ण
सूर्योदय सोसायटी - एक रुग्ण
शिवशक्ती नगर - एक रुग्ण