मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, देशात महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०००च्या वर गेला असून, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्यासुद्धा १००च्या वर गेली आहे. राज्यात १४ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ होती. जी १० एप्रिलला वाढून १५७४वर पोहोचली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ९९३वर गेला असून, शुक्रवारी १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज कोरोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या १५७४ झाली आहे. कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ हजार ९३ नमुन्यांपैकी ३० हजार ४७७जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १० तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ९ पुरुष तर ४ महिला आहेत. आज झालेल्या १३ मृत्यूंपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत, तर दोघे जण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशीलमुंबई महापालिका १००८ (मृत्यू ६४) ठाणे ०३ठाणे मनपा २८ (मृत्यू ०३)नवी मुंबई मनपा ३२ (मृत्यू ०२)कल्याण-डोंबवली मनपा ३४ (मृत्यू ०२)उल्हासनगर मनपा ०१भिवंडी निजामपूर मनपा ०० मीरा भाईंदर मनपा २१ (मृत्यू ०१)पालघर ०३ (मृत्यू ०१)वसई विरार मनपा १२ (मृत्यू ०३)रायगड ००पनवेल मनपा ०६ (मृत्यू ०१)ठाणे मंडळ एकूण ११४७ (मृत्यू ७७)नाशिक ०१नाशिक मनपा ०१मालेगाव मनपा ०५ (मृत्यू ०१)अहमदनगर ०९अहमदनगर मनपा १६धुळे ००धुळे मनपा ००जळगाव ०१जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१)नंदूरबार ००नाशिक मंडळ एकूण ३४ (मृत्यू ०२)पुणे ०७पुणे मनपा २१९ (मृत्यू २५)पिंपरी चिंचवड मनपा २२सोलापूर ००सोलापूर मनपा ०० सातारा ०६ (मृत्यू ०१)पुणे मंडळ एकूण २५४ (मृत्यू २६)कोल्हापूर ००कोल्हापूर मनपा ०५सांगली २६ सांगली मिरज कुपवाड मनपा ००सिंधुदुर्ग ०१रत्नागिरी ०५ (मृत्यू ०१)कोल्हापूर मंडळ एकूण ३७ (मृत्यू ०१)औरंगाबाद ०१ औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१)जालना ०१हिंगोली ०१ परभणी ००परभणी मनपा ००औरंगाबाद मंडळ एकूण १९ (मृत्यू ०१)लातूर ००लातूर मनपा ०८उस्मानाबाद ०४बीड ०१नांदेड ००नांदेड मनपा ००लातूर मंडळ एकूण १३अकोला ००अकोला मनपा १२अमरावती ००अमरावती मनपा ०४ (मृत्यू ०१)यवतमाळ ०४बुलढाणा १३ (मृत्यू ०१)वाशिम ०१अकोला मंडळ एकूण ३४ (मृत्यू ०२)नागपूर ००नागपूर मनपा २५ (मृत्यू ०१)वर्धा ००भंडारा ००गोंदिया ०१चंद्रपूर ००चंद्रपूर मनपा ००गडचिरोली ००नागपूर मंडळ एकूण २६ (मृत्यू ०१)इतर राज्ये ०९एकूण १५७४ (मृत्यू ११०)राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४३७४ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Coronavirus : राज्यात कोरोनाबधितांचा आकडा दीड हजारांवर; मृतांची संख्याही शंभरी पार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 9:47 PM