मुंबईः राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं असून, रुग्णांची संख्यादेखील ११६वरून १२२वर गेली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबईतल्या ४ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण असे सहा रुग्ण आढळून आले आहेत.मुंबई शहर आणि उपनगर ४१, पिंपरी चिंचवड १२, पुणे १९, नवी मुंबई ५, कल्याण ५, नागपूर ४, यवतमाळ ४, सांगली ४, अहमदनगर ३, ठाणे ३, सातारा २, पनवेल १, उल्हासनगर १, औरंगाबाद १, रत्नागिरी १, वसई-विरार १ अशा रुग्णांचा समावेश आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला होता. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या १२ रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला रुग्णांना बरे करण्यात यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या १५ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
कस्तुरबातील आठ जणांना घरी सोडलेमुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील आठ रुग्ण कोरोना विषाणुमुक्त झाले असून त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले़ लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच सुरक्षित राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. घाटकोपर येथील झोपडपट्टीतील महिला कोरोना निगेटिव्ह झाली आहे, तिच्या ९ निकटवर्तीयांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचे रोपोर्ट निगेटिव्ह आला. भारतात रुग्णांची संख्या वाढून ५६२ झाली आहे. यातील ५१९ लोक भारतीय आहेत. ४३ लोक परदेशातील आहेत. दिल्लीत मृत्यू झालेल्या दुसर्या व्यक्तीचा अहवाल नकारात्मक आहे. आतापर्यंत ४० लोक बरे झाले आहेत. तामिळनाडूच्या मदुरै येथील राजाजी रुग्णालयात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला.