मुंबई : कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग पडताळण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या सूचनेनुसार महापालिकेने व्यक्तींचे सर्वेक्षण करतानाच बिगर शासकीय संस्थांच्या सहकार्याने चेंबूर, टिळकनगर, सायन, वडाळा, दहिसर येथे सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी सोसायट्यांकडून यास परवानगी दिली जात नाही. परिणामी या सेरो सर्वेक्षणास विरोध करू नका तर सहकार्य करा, असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिकेने केला असून, त्यानुसार कोविड संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दोन हजार नमुने संकलित करण्यात आले आहेत.कोरोनाला हरविण्यासाठी संक्रमणाचा कल समजावून घेण्याकरिता मुंबईत राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण सुरू झाले. कांदिवली, देवनार, धारावी, कुर्ला येथे ५०० व्यक्तींचे सर्वेक्षण करतानाच याआधारे संक्रमणाचा सामुदायिक प्रसार होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल, असा दावा पालिकेने केला आहे. २६ जूनपर्यंत मुंबईत ५०० व्यक्तींचे सेरो सर्वेक्षण केले असल्याचा दावा पालिकेने केला.कोरोना योद्ध्यांसाठी स्वतंत्र सर्वेक्षणरक्ताचे नमुने एकत्रित करत कस्तुरबा सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये, फरिदाबाद ट्रान्सलेशन विज्ञान औद्योगिक संस्थानकडे पाठवत अँटिबॉडीज निदान करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण होत असलेल्या विभागांमध्ये आरोग्य कर्मचारी तसेच कोरोनाविरुद्ध लढ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सर्वेक्षण घेण्यात येणार आहे.च्मुंबई उपनगर जिल्हा को.आॅप. हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र मोरे यांनी सांगितले की, कोरोनाला हरविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. केवळ सेरो सर्वेक्षण नाही तर कोणत्याही चाचणी, सर्वेक्षण करताना मुंबई महापालिकेने सोसायटीसोबत सुसंवाद साधला पाहिजे. सोसायट्यांना एखादा विषय नीट समजावून सांगितल तर अडचणी येणार नाही.सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे निमगावकर यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील सोसायट्यांनी यापूर्वी घरकाम करणाºया महिलांना प्रवेश देण्यास नकार दिला. आता पुन्हा सेरो सर्वेक्षणाबाबत गोंधळ सुरु झाला आहे. मुळात जेथे आरोग्याचा प्रश्न येतो; तेथे एकत्र कामे केले पाहिजे. सेरो सर्वेक्षण हे आपल्यासाठी आहे. कोरोनाला हरविण्यासाठी या गोष्टी सुरु आहेत.
coronavirus: जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येणार, मुंबई महापालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 7:23 AM