coronavirus: कोरोना लसीकरणाच्या शीतगृहाचे काम जानेवारी २०२१ अखेर पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 02:39 AM2020-12-07T02:39:21+5:302020-12-07T02:40:00+5:30
Mumbai coronavirus News : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी अद्याप यावर जगात कुठेही प्रभावी लस सापडलेली नाही. आणि प्रभावी लस सापडली तरी सर्वसामान्य माणसाला ही लस मिळेपर्यंत २०२१ उजाडेल, असे म्हटले जात आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी अद्याप यावर जगात कुठेही प्रभावी लस सापडलेली नाही. आणि प्रभावी लस सापडली तरी सर्वसामान्य माणसाला ही लस मिळेपर्यंत २०२१ उजाडेल, असे म्हटले जात आहे.
मात्र समजा ही लस सापडली आणि सापडलेली लस मुंबईत नेमकी कुठे ठेवायची, या प्रश्नाचे उत्तर मुंबई महापालिकेने शोधून काढले असून, कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाच्या साठ्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे कांजुरमार्ग ( पूर्व) कांजुरमार्ग परिवार संकुलात कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. कांजुरमार्ग परिवार संकुलात कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. येथे निश्चित करण्यात आलेल्या शीतगृहाचे काम जानेवारी २०२१ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
कांजुरमार्ग परिवार संकुलात कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. पाच माळ्यांपैकी तीन माळे हे शीत गृह केंद्रासाठी निश्चित आहेत.
अचानक पुरवठा खंडित झाल्यास उपाय
कांजुरमार्ग परिवार संकुलात कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे शीतगृहे हे सकाळी सौरऊर्जेवर, रात्री थेट वीजपुरवठ्यावर चालविण्यात येणार आहे. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिटनिहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.