coronavirus: उत्तर मुंबईत कोविड रुग्ण निदानाचा दर कायम, कुलाब्यात कालावधी घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:00 AM2020-08-31T03:00:51+5:302020-08-31T03:01:13+5:30

मुंबईत २८ आॅगस्ट रोजी १ हजार १८० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३१ टक्के रुग्ण हे बोरीवली, कांदिवली, दहिसर, वांद्रे पश्चिम, कुलाबा आणि गोरेगाव या विभागांमधील आहेत. या पाच विभागांमध्ये ३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली.

coronavirus : Corona virus Mumbai news | coronavirus: उत्तर मुंबईत कोविड रुग्ण निदानाचा दर कायम, कुलाब्यात कालावधी घटला

coronavirus: उत्तर मुंबईत कोविड रुग्ण निदानाचा दर कायम, कुलाब्यात कालावधी घटला

Next

मुंबई  - उत्तर मुंबईतील कोविड संसर्गावर प्रतिबंध असला तरी अद्याप रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांपेक्षा आलेला नाही. तर, कुलाबा आणि वांद्रे पश्चिम प्रभागात आठवडाभरात संसर्गाच्या दरात किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या कोविडच्या नव्या रुग्णांपैकी ३१ टक्के रुग्ण हे मुंबईतील पाच प्रभागांमधील असून कुलाबा येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांनी घटला आहे.

मुंबईत २८ आॅगस्ट रोजी १ हजार १८० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३१ टक्के रुग्ण हे बोरीवली, कांदिवली, दहिसर, वांद्रे पश्चिम, कुलाबा आणि गोरेगाव या विभागांमधील आहेत. या पाच विभागांमध्ये ३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील बोरीवली आर मध्य प्रभागात सर्वाधिक १२८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.
दहिसरमध्येही किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे. २२ आॅगस्ट रोजी १.१४ टक्के दर होता, तो १.२३ टक्क्यांवर आला आहे. गोरेगाव पी दक्षिण प्रभागात २२ आॅगस्ट रोजी रुग्णवाढीचा दर ०.९५ टक्के होता. मात्र, आता वाढून १.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते कोणत्याही साथीच्या आजारातील रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास संसर्गाला प्रतिबंध झाल्याचे मानले जाते. गोरेगावप्रमाणेच कुलाबा ए प्रभागाची परिस्थिती आहे. २२ आॅगस्ट रोजी रुग्णवाढीचा दर ०.९५ टक्के होता. आता १.११ टक्के आणि एच पश्चिम वांद्रे, सांताक्रुझ-खार पश्चिम परिसरातील रुग्णवाढीचा दर १.०५ टक्क्यांवरून १.१४ टक्क्यांवर आला आहे. पाच प्रभागांपैकी बोरीवलीत १२८, कांदिवली ७६ ,दहिसर ४६ ,वांद्रे पश्चिम ५६ ,कुलाबा ३३ आणि गोरेगाव येथे ३३ नव्या रुग्णांची नोंद २८ आॅगस्टला झाली आहे.

जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून संसर्ग
1जुलैच्या दुसºया पंधरवड्यापासून उत्तर मुंबईत कोविडचा संसर्ग वाढू लागला. या भागांमध्ये चेस द व्हायरस मोहीम राबवून पालिकेने संसर्गावर नियंत्रण मिळवले. मात्र, आर मध्यसह कांदिवली आर दक्षिण, दहिसर आर उत्तर या प्रभागातील कोविडवाढीचा दर एक टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
2मुंबईत कोविडवाढीचा सरासरी दर ०.७८ टक्क्यांपर्यंत आला आहे. आर मध्य प्रभागात २२ आॅगस्ट रोजी रुग्णवाढीचा दर १.५३ टक्के होता, तो आता १.४७ टक्क्यांवर आला आहे. आर दक्षिण प्रभागात रुग्णवाढीचा दर १.१७ टक्यांवरून १.२६ टक्क्यांवर वाढला आहे.

Web Title: coronavirus : Corona virus Mumbai news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.