coronavirus: कोरोनासे हम नही डरेंगे; मुंबईकरांवर कोरोनाचा परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:18 PM2020-03-17T16:18:55+5:302020-03-17T16:22:04+5:30
- मनोहर कुंभेजकर मुंबई : रोज पहाटे पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत मुंबईकर घडाळयाच्या ठोक्याप्रमाणे धावत असतो.मात्र कोरोनाच्या महामारीचा ...
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: रोज पहाटे पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत मुंबईकर घडाळयाच्या ठोक्याप्रमाणे धावत असतो.मात्र कोरोनाच्या महामारीचा तसा परिणाम मुंबई करांमध्ये जाणवत नसल्याचे चित्र आहे.कोरोनासे हम नही डरेंगे असाच काहीसा पवित्रा मुंबईकरांचा असल्याचे आजचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरून काम करा अश्या सूचना दिल्या असतांना अनेक आस्थापने सुरूच असल्याने रेल्वे,बस व मेट्रो,बँका मध्ये गर्दी दिसत होती.तर जवळ जवळ सर्वच शिक्षण संस्था बंद होत्या.
कोरोनाचा मुंबईकरांवर काय फरक पडला याची पाहणी करण्यासाठी आज सकाळी 11.26 मिनीटांनी वर्सोव्यावरून मेट्रो पकडली. मेट्रो तशी नेहमीप्रमाणे येथून गर्दी होती.११.३२ मिनीटांनी मेट्रो अंधेरी मेट्रो स्टेशनात येताच घाटकोपरच्या दिशेने जाण्यासाठी मेट्रोत प्रवाश्यांनी तुडुंब गर्दी केली.गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकावरून नागरी निवारा समोरील इन्फिनिटी आयटी पार्कला कामावर जाण्यासाठी नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांची गर्दी होती. येथील ३४७,४५२,646 या एसी बसेस सुद्धा तुडुंब भरून जात होत्या.तर आयटी पार्ककडे सुमारे १०० खाजगी बसेस सुद्धा कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन आल्या होत्या.
तर अंधेरी पूर्व स्टेशनच्या आगरकर रोड आणि अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकांच्या बाहेर बस पकडण्यासाठी प्रवाश्यांच्या लांबच लांब रांगा होत्या. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांनी तोंडावर हिरव्या,पिवळ्या,काळ रंगाचा मास्क तर काहींनी आपला रुमाल तोंडावर बांधण्याचे पसंत केल्याचे परिधान केल्याचे दृश्य होते.वर्सोवा यारी रोड,अंधेरी पूर्व येथील न्यू इंडिया बँकेत देखिल नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती. वेसावे-मढ जेट्टी दरम्यान सकाळी पहाटे ५.३० ते मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत येथील फेरी बोट सेवा सुरू असून रोज यामधून सुमारे ८००० ते १०००० नागरिक प्रवास करतात.