Join us  

Coronavirus: कोरोना योद्ध्यांच्या वारसाला मिळणार नोकरी; मुंबई पालिका प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 3:52 AM

मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न

मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही सहभागी आहेत. मात्र विविध विभागांत काम करताना या आजाराचा संसर्ग होऊन आतापर्यंत चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. २४ मार्चला लॉकडाउन सुरू झाल्यानंतरही महापालिकेच्या विविध विभागांत अत्यावश्यक सेवांसाठी काम करणारे कर्मचारी व अधिकारी रोज कार्यालयात येत आहेत. धारावी, वरळी अशा झोपडपट्टी परिसरात साफसफाई, मदतकार्य, अन्नवाटपासाठी पालिकेची पथके कार्यरत आहेत. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. धारावीत अन्नवाटपाची जबाबदारी असलेल्या आणि पालिकेच्या जी-उत्तर विभागात करनिर्धारण आणि संकलन खात्यात निरीक्षक पदावर काम करीत असलेल्या अधिकाºयाचा कोरोनामुळे बळी गेला. अशा चार कर्मचाºयांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

नागरी सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी पालिकेतील कामगारांना १०० टक्के उपस्थिती आता बंधनकारक केली आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी मृत कर्मचाºयांच्या कुटुंबातील एका वारसाला पालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.अशी मिळेल संधी...वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कामगार, कक्ष परिचर, हमाल, आया, कार्यालयीन शिपाई, लिपिक, कनिष्ठ लेखा परीक्षक, लेखासाहाय्यक या रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका