CoronaVirus: दिलासादायक! मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:42 AM2020-04-30T05:42:36+5:302020-04-30T07:26:43+5:30

श आणि राज्याच्या तुलनेत मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर कमी असल्याचे निरीक्षण या केंद्रीय समितीने नोंदवले आहे.

CoronaVirus: The coronary heart disease rate in Mumbai is low | CoronaVirus: दिलासादायक! मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर कमी

CoronaVirus: दिलासादायक! मुंबईतील कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर कमी

Next

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत ७० हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पण या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे देश आणि राज्याच्या तुलनेत मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर कमी असल्याचे निरीक्षण या केंद्रीय समितीने नोंदवले आहे. १७ ते २७ एप्रिलदरम्यान रुग्णवाढीच्या दुपटीचा दर ८.३ दिवसांवरून दहा दिवसांवर आला
आहे. तर मृत्यूदरही ६.३ वरून ३.९ पर्यंत खाली आला आहे. समितीच्या या निष्कर्षाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय पथकाने मुंबईत येऊन येथील हॉटस्पॉट विभागांची पाहणी केली. या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या योजनांंचा आढावा समितीने घेतला. मुंबई पालिकेच्या काही प्रयोगांचे कौतुकही या पथकाने केले. त्यांच्या निष्कर्षांनुसार १७ ते २७ एप्रिलदरम्यान रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १० दिवसांवर गेला आहे. जो यापूर्वी ८.३ दिवस असा होता. देशपातळीवर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा ९.५ दिवस आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर हा कालावधी ८.९ दिवस इतका आहे. राज्यात प्रत्येक
शंभर बाधित रुग्णांमागे सरासरी ४.३ रुग्णांचा मृत्यू होत आहे. तर मुंबईत सरासरी ३.९ टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे, असे समोर आले आहे.
>चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक
मुंबईत आतापर्यंत ६६ हजार चाचण्या करण्यात आल्या. याचे प्रतिदशलक्ष व्यक्ती प्रमाण पाच हजार ७१ एवढे आहे. तर तामिळनाडू, राजस्थान, नवी दिल्ली, केरळ येथील हे प्रमाण अनुक्रमे २,६२४; १,२२०; ७९४ आणि ६८४ आहे. ‘फिव्हर क्लिनिक्स’च्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रुग्णांचा शोध सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.
>रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम तीव्र
बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम पालिकेने तीव्र केली आहे. २६ एप्रिलपर्यंत एक लाख २९ हजार ४७७ रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आले. यातील २१ हजार ५३ हे हाय रिस्क गटातील संपर्क होते. यातून १,६४७ रुग्ण शोधले आहेत.
या शोधमोहिमेतून बाधित रुग्णाच्या निकटचा संपर्क असलेल्या व्यक्तीला क्वॉरंटाइन करणे, दूरचा संपर्क आलेल्या व्यक्तीला होम क्वॉरंटाइन करून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. तर बाधित रुग्ण आढळलेली ठिकाणे प्रतिबंधित म्हणून जाहीर केली जात आहेत.

Web Title: CoronaVirus: The coronary heart disease rate in Mumbai is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.