जागतिक आघाडीचे विषाणूशास्त्रज्ञ व ‘लंडन स्कूल आॅफ हायजीन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन’चे संचालक डॉ. पीटर पिऑट यांनी कोरोना साथीबाबत लोकांच्या मनातील प्रश्न व शंकांना अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे दिलेली आहेत. ‘इबोला’ साथीच्या विषाणूचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये डॉ. पीटर पिऑट हे एक प्रमुख आहेत.विषाणू म्हणजे काय?विषाणू हा ‘डीएनए’ किवा ‘आरएनए जेनेटिक कोड’चा बाहेरून प्रोटिनचे आवरण असलेला एक अत्यंत सूक्ष्म कण असतो.विषाणू नेमके किती सूक्ष्म असतात?विशाणू एवढे सूक्ष्म असतात की साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रानेही ते दिसत नाहीत. एका टाचणीच्या टोकावर नॉव्हेल कोरोनाचे १०० दशलक्ष विषाणू सहज मावू शकतात, एवढे ते अविश्वसनीय सूक्ष्म असतात.विषाणूंविषयी काय सांगाल?आपली पृथ्वी हा एक विषाणूंनीच भरलेला ग्रह आहे, असे म्हणता येईल. विषाणूंचे वर्तन परजीवींसारखे असते. पुनरुत्पादनासाठी ते अन्य सजीवांच्या पेशींमध्ये शिरकाव करतात. एक प्रकारे विषाणू त्या पेशीला ‘हायजॅक’ करतात व ती पेशी तशाच प्रकारचे शेकडो विषाणू तयार करते. शेवटी हे विषाणू एवढे वरचढ ठरतात की, ती यजमान पेशीच मरून जाते.‘सार्स सीएव्ही-२’ व ‘कोविड-१९’ या दोन्हींत फरक काय?‘सार्स सीएव्ही-२’ हे विषाणूचे तर ‘कोविड-१९’ हे त्यामुळे होणाºया आजाराचे नाव आहे.किती प्रकारचे कोरोना विषाणू माणसासाठी अपायकारक आहेत?एकाकडून दुसºयास संसर्ग होऊ शकेल असे सात कोरोना विषाणू आहेत. त्यापैकी चार विषाणूंमुळे सौम्य सर्दी-पडसे होते. इतर तीन जीवघेणे ठरू शकतात. त्यापैकी ‘एसएआरसी’ (सार्स) व ‘एमईआरएस’ या दोन जीवघेण्या कोरोना विषाणूंची साथ यापूर्वी आपण अनुभवली. आता आलेला ‘सार्स-सीओव्ही-२’ हा त्याच जातकुळीतील तिसरा विषाणू आहे.या विषाणूच्या नावातील ‘नॉव्हेल’ हा शब्द काय दर्शवतो?‘नॉव्हेल’चा अर्थ नवा, माणसाने यापूर्वी पाहिलेला नाही, असा. माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारात्मक व्यवस्था २० दशलक्ष वर्षे विकसित होत आली आहे. या ‘नॉव्हेल’ विषाणूंचा अनुभव नसल्याने ही व्यवस्था अशा विषाणूंपुढे काम करत नाही. जीवाला होणाºया जास्त धोक्यामुळे हा नवा विषाणू चिंतेचे कारण ठरला आहे.कोरोना वर्गातील आधीचे ‘सार्स’ व ‘मर्स’ विषाणू व आताचा ‘सार्स सीव्ही- २’ यामध्ये फरक काय?कित्येक लोकांना नव्या विषाणूची लागण झाली तरी अनेक दिवस लक्षणे दिसत नाहीत. अशा लोकांकडून अजाणतेपणे इतरांना प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कोणाला वेगळे ठेवायचे हेही कळत नाही. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असल्याने ही बाब चिंतेची आहे. ८० टक्के व्यक्तींना किरकोळ सर्दी-खोकला होतो. तेही वेगळे राहत नसल्याने इतरांना लागण होते. याची लक्षणे फ्लूसारखीच दिसतात. महत्त्वाचा फरक म्हणजे लागण झाल्यावर सुरुवातीस या विषाणूंचे वास्तव्य घशाच्या वरच्या भागात असल्याने याचा प्रादुर्भाव एकाकडून दुसºयास सहज होऊ शकतो. या काळात व्यक्तीचा घसा हे या विषाणूंचे आगर असते. त्यामुळे अशी व्यक्ती खोकली किंवा शिंकली तरी अब्जावधी विषाणू इतरांना प्रादुर्भाव करू शकतात.या विषाणूने न्यूमोनिया होतो, असे म्हणतात. मग यात घशाचा काय संबंध?या आजाराची सुरुवात घशापासून होते. म्हणूनच तपासणीसाठी घशातील द्रावात भिजलेला कापसाचा बोळा घालतात. आजार बळावल्यास विषाणू श्वसननलिकेतून फुप्फुसात उतरतात व हा आजार निम्न श्वसनसंस्थेचा होतो.हा विषाणू कितपत प्राणघातक आहे?बहुतांश वैज्ञानिकांच्या मते लागण होणाºया लोकांपैकी १ ते २ टक्के लोकांचे प्राण जाऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने मृत्यूचे प्रमाण कदाचित ३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, असे म्हटले आहे. पण ज्यांना अन्य जुनाट आजार आहेत त्यांना हा आजार जास्त प्राणघातक ठरू शकतो. अशा वयोवृद्धांत मृत्यूची शक्यता १० ते १५ टक्के असू शकते. अशांवर ‘आयसीयू’मध्ये उपचार करावे लागतात.या विषाणूचा शिरकाव झाल्यावर फैलाव कुठे व कसा होतो?बहुधा सुरुवात खोकल्यापासून होते. नंतर हलका व पुढे सणकून ताप येतो. श्वसनाचा त्रास सुरू होतो. तेव्हाच निदान व उपचार हे जीव वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. अजून यावर लस निघालेली नाही किंवा कोणतेही औषधही नाही. अॅन्टिबोयोटिक्सही फारशी उपयोगी पडत नाहीत. कारण विषाणू नवा आहे.यासाठी कोणते उपाय योजता येतील?वारंवार हात धुणे, सतत तोंडाला हात न लावणे, खोकला वा शिंक येईल तेव्हा तोंडावर हात किंवा रुमाल धरणे, हस्तांदोलन न करणे व गळाभेट न घेणे हे करता येईल. व्यक्तिगत स्वच्छता व चांगल्या सवयी पाळायल्या हव्यात. सार्वजनिक पातळीवर ‘सोशल डिस्टंसिंग’गरजेचे आहे. घरून काम करणे, सार्वजनिक वाहनांतून प्रवास न करणे, शाळा-कॉलेज, कार्यालये बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रम बंद करणे हे त्यापैकी काही उपाय आहेत.
Coronavirus : 'लक्षणे न दिसतानाही प्रसार होणे कोरोनाचा सर्वात मोठा धोका'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 2:42 AM