Coronavirus :राज्य पोलीस दलात कोरोनाचा दुसरा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:11 AM2020-04-27T06:11:18+5:302020-04-27T06:11:30+5:30

तीन वर्षांपूर्वी कर्करोगाला हरवून त्यांनी पुन्हा उभारी घेतली होती. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंंग यांनी टिष्ट्वटरद्वारे माहिती दिली.

Coronavirus :Corona's second death in state police force | Coronavirus :राज्य पोलीस दलात कोरोनाचा दुसरा मृत्यू

Coronavirus :राज्य पोलीस दलात कोरोनाचा दुसरा मृत्यू

Next

मुंबई : कोरोनाने राज्य पोलीस दलात रविवारी दुसरा मृत्यू झाला आहे. वाकोला पोलीस ठाणे पाठोपाठ मुंबईतील संरक्षण शाखा ४ मधील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षांपूर्वी कर्करोगाला हरवून त्यांनी पुन्हा उभारी घेतली होती. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंंग यांनी टिष्ट्वटरद्वारे माहिती दिली.
नवी मुंबईतील कामोठे येथे राहणारे संबंधित पोलीस हवालदार संरक्षण शाखा ४ येथे कार्यरत होते. २३ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच, उपचारांसाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या पोलिसाच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करत ते राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे. हे हवालदार २०१७मध्ये कर्करोगाला हरवत त्यातून ते पुन्हा उभे राहिले. पुढे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते नवी मुंबईवरून दक्षिण मुंबईत असलेल्या कार्यालयात बसने जात होते.
५० लाख रुपयांची मदत
दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत व शासकीय नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकद्वारे संवाद साधताना सांगितले.

Web Title: Coronavirus :Corona's second death in state police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.