मुंबई : शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस नाईकचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलात कोरोनाने घेतलेला हा सहावा बळी आहे.मृत पोलीस नाईक हे नवी मुंबईतील रहिवासी होते. तेथील पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापूर्वी शिवडी पोलीस ठाण्यातील ५५ वर्षीय साहाय्यक उपनिरीक्षकाचा मंगळवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला होता.राज्य पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या हजारांहून अधिक आहे. दिलासादायक बाब म्हणजे, गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत कोरोनावरील उपचारानंतर १४२ पोलीस बरे झाले आहेत. ८९ अधिकाऱ्यांसह ७६२ अंमलदारांवर उपचार सुरू आहेत.विशेष पोलीस महानिरीक्षकालाही कोरोनाची लागणकोकण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री १० वाजता त्यांना मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा सहावा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:01 AM