coronavirus: मुंबईत कोरोनावाढीचा वेग मंदावला, तरी वाढत आहेत पोस्ट कोविड समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 02:17 AM2020-10-28T02:17:27+5:302020-10-28T02:17:35+5:30

Coronavirus news : पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते.

coronavirus: Coronavirus growth slows in Mumbai, but post-covid problems are on the rise | coronavirus: मुंबईत कोरोनावाढीचा वेग मंदावला, तरी वाढत आहेत पोस्ट कोविड समस्या

coronavirus: मुंबईत कोरोनावाढीचा वेग मंदावला, तरी वाढत आहेत पोस्ट कोविड समस्या

Next

- मनोहर कुंभेजकर 
मुंबई : मुंबईत कोरोना संसर्गवाढीचा वेग जरी मंदावला असला तरी अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी, मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. कारण पोस्ट कोविड समस्या वाढत असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. बऱ्याचदा मायकोकार्डायटीससारखा हृदयाचा आजारही जाणवतो. डायबिटीस, हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात. स्कीन रॅश येणे किंवा मानसिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आढळते, अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

वास्तविक पाहता आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना सातव्या-दहाव्या दिवशी हॉस्पिटलमधून असिम्टोमॅटिक असल्याने रुग्णाला घरी पाठवले जाते. त्याची पुन्हा पूर्वीप्रमाणे टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत थांबवले जात नाही. त्यामुळे टेस्ट करण्याचा प्रश्न येत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

पण व्हायरस शेडिंग म्हणजे शरीराबाहेर फेकण्याचे प्रमाण नेमके दहा दिवसांनंतर कोविड रुग्णांना पुन्हा दिसू लागतात. अशा पोस्ट कोविड रुग्णांचा सर्व्हे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण जर पोस्ट कोविड रुग्णांचा सॅम्पल सर्व्हे  झाला तर खूप रुग्णांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनपासून वाचवता येईल, अशी विनंती  सहायक आयुक्तांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आता नवीन स्टडीप्रमाणे इतर लक्षणांबरोबर लहान मुलांमधील ‘कावासाकी’ हा आजारही मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्ये दिसू लागला आहे. यामध्ये व्हस्क्युलायटीस ताप येणे, अंगावर पूरळ येणे यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे पोस्ट कोविड रुग्णांना लग्ज फायब्रोसीस, हृदयविकार यांच्या उपचारांबरोबर मानसोपचाराची गरज आहे. त्यासाठी पोस्ट कोविड सेंटर गरजेचे आहे, अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 

Web Title: coronavirus: Coronavirus growth slows in Mumbai, but post-covid problems are on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.