Join us

Coronavirus: कोरोनामुळे राज्यात २१ जणांचा बळी; ८८ नवीन रुग्णांची नोंद, ४२ रुग्णांना सोडले घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 2:02 AM

राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

मुंबई : राज्यात शुक्रवारी कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे, ११ पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २  रुग्ण औरंगाबादचे तर  प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.राज्यात गुरुवारी एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३  नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत.  आतापर्यंत ४२ करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार२४४  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेसाठी संपूर्ण राज्यात २३३२ टीमराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी २९२ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३७३ टीम कार्यरत आहेत.

नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा २३३२ टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे.

दिलासादायक! रुग्ण झाले कोरोनामुक्त

च्मुलूंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाच्या (कोविड-१९) च्या एका रुग्णाला यशस्वी उपचारांनंतर गुरुवारी घरी पाठविण्यात आले. यूकेमध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला हा ४६ वर्षीय पुरुष अलीकडेच देशात परतला होता. ताप, घसा बसणे आणि श्वसनमार्गाच्या वरच्या भागात जंतूसंसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने २५ मार्च रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला विलगीकरण वॉर्डमध्ये लक्षणांवरून उपचार करण्यात आले. या उपचारांना त्याने चांगला प्रतिसाद दिला व सात दिवस रुग्णालयामध्ये राहून हा रुग्ण स्वगृही रवाना झाला.

रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमने आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार घरच्या घरी क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत त्याचे समुपदेशन केलेरुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित म्हणाले, पहिल्या कोविड रुग्णाला डिस्चार्ज दिला याविषयी वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीममध्ये अत्यंत सकारात्मकतेची भावना आहे.

च्घाबरून जाऊ नका, रुग्णांवर उपचार केले जात आहेत, त्यांची तब्येत सुधारत आहे आणि संपूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरीही सोडले जात आहे. कल्याणमधील अमेरिकेतून परत आल्यानंतर ३८ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली. ते व्हेंटिलेटरवर होते, त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. जसलोक रुग्णालयामधून डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीला ते पुन्हा भेटले, त्यांनाही कोरोना झाला होता. मात्र आता हे सर्वजण पूर्णपणे बरे झाले आहेत.

डॉ. ओम श्रीवास्तव म्हणाले की, अचूक व्यवस्थापन आणि योग्य उपचार करून रुग्ण कोविड -१९ वर मात करू शकतात. त्यांची मोठी मुलगी संसर्गापासून वाचली आणि तिला सोलापुरात त्यांच्या गावी पाठविण्यात आले होते. राजवाडीत भीतीचे वातावरणघाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी आला होता. मात्र, तो कोरोनाग्रस्ताचा असल्याचे समजल्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांना आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन मार्गदर्शक तत्वानुसार अंत्यसंस्कार करण्यास सांगितल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

जेष्ठ नागरिकांचा मृत्यू

मुंबईत बुधवार आणि गुरुवारी चार जणांचा बळी गेला आहे. त्यात ६१ वर्षे वर्षीय रुग्ण ३१ मार्च रोजी नायर रुग्णालयात भरती झाला. त्याला रक्ताचा कर्करोग होता. त्याचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. तर ५८ वर्षीय रुग्णाला मूत्रपिंडाचा जुनाट आजार होता, तो रुग्ण २९ तारखेला भरती झाला होता. त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. बुधवारी संध्याकाळी त्याचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, २६ मार्च रोजी ५८ वर्षीय पुरुष एका खासगी रुग्णालयात भरती झाला. बुधवारी दुपारी मृत्यू झाला.

कस्तुरबा रुग्णालयात ६३ वर्षीय रुग्णाचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळए एकूण २० बळी गेले आहेत. दिल्ली येथील धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या मुंबईतील नागरिकांची संख्या १२७ इतकी आहे. त्यातील १०५ जणांना पालिकेच्या आरÞोग्य विभागाने क्वारंटाइन केले आहे. तर अन्य नागरिकांचा शोध सुरु असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याराजेश टोपे