मुंबई : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा फोकस मुंबई-ठाण्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे सरकला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत कोरोनालढ्यात काही जिल्ह्यांकडून झालेल्या चुका तुम्ही होऊ देऊ नका, असे त्यांनी बजावले.सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रित कराल तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा,चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा,कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहायक यांच्या सहभागाने आपण संपूर्ण राज्यात घरोघर भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यात घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का ? त्यांचे आरोग्य कसे आहे? त्यांना न्युमोनियासदृश्य काही लक्षणे आहेत का? घरात बाहेरून कुणी व्यक्ती आल्या आहेत काय? मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का याविषयी पूर्ण माहिती विचारली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.मंदिरांबाबत प्रतीक्षाचमंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंती करण्यात येत आहेत मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मंदिरे खुली होण्यासाठी काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे संकेत दिले.
coronavirus: पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक ! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 1:12 AM