Coronavirus : 'दोन दिवसांत प्रयोगशाळांची क्षमता वाढविणार, KEMमध्ये सुद्धा तपासणीची सोय'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:28 PM2020-03-15T17:28:12+5:302020-03-15T18:07:32+5:30

Coronavirus : सध्या कस्तुरबा गांधी रूग्णालयात करोनासाठी विलगीकरण कक्ष सुरू आहे.

Coronavirus : In a couple of days, the laboratories will be enhanced, KEM will also be tested - Rajesh Tope | Coronavirus : 'दोन दिवसांत प्रयोगशाळांची क्षमता वाढविणार, KEMमध्ये सुद्धा तपासणीची सोय'

Coronavirus : 'दोन दिवसांत प्रयोगशाळांची क्षमता वाढविणार, KEMमध्ये सुद्धा तपासणीची सोय'

googlenewsNext
ठळक मुद्देकरोनाचा मुकाबला करण्यासाठी कस्तुरबा सज्जदिवसाला २५० नमुने तपासण्याची क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात येईलकोरोनाची लक्षणांच्या तपासणीसाठी कस्तुरबा रूग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात साधारण ३५० रूग्ण येतात.

मुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. कस्तुरबा गांधी रूग्णालयासह मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू केली जाईल. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दररोज २५० नमुने तपासण्याची क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात येईल. बुधवारपासून या दोन्ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. याशिवाय मुंबईतील जे.जे. रूग्णालय, हाफकीन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील ससून रूग्णालयातही पंधरा दिवसात प्रयोगशाळा कार्यान्वित होतील, अशी माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कस्तुरबा गांधी रूग्णालयाची पाहणी केली. येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेतला. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे टोपे यांनी पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या प्रतिदिन शंभर नमुने तपासण्या इतकी कस्तुरबा गांधी रूग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता आहे. नवीन उपकरणांच्या आधारे या क्षमतेत वाढ केली जाईल. कस्तुरबासह मुंबई महापालिकेच्या के.ई.एम. रूग्णालयातील प्रयोगशाळेतही बुधवारपासून नवीन यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे कस्तुरबा आणि के.ई.एम येथे दररोज प्रत्येकी २५० नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कस्तुरबा, के.ई.एम.सह अन्यत्रही या व्यवस्थांचा विस्तार केला जाणार आहे. मुंबईतील जे.जे. रूग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात याबाबतचे आदेश जारी केले जातील. नवीन उपकरणे आणि कुशल मनुष्यबळासाठी आवश्यक प्रशिक्षणासह पुढील पंधरा ते वीस दिवसांत या ठिकाणच्या प्रयोगशाळा कार्यारत होतील, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याशिवाय, औरंगाबाद, सोलापूर, धुळे आणि मिरज या शहरांतील वैद्यकीय महाविद्यालयातही महिनाभरात प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाचे एकूण ३२ पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. यापैकी नऊ रुग्णांवर कस्तुरबा येथील वलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. याशिवाय इथे ८० संशयीत रूग्ण आहेत. कस्तुरबा रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात दररोज साधारण ३५० नागरिक तपासणी साठी येतात. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

कस्तुरबा रूग्णालयातील यंत्रणा सज्ज 
डाँक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत सुरक्षा यंत्रणेचे ४५०० संच आणि एन ९५चे चार हजारहून अधिक मास्क रूग्णालयात उपलब्ध आहेत. येथील रुग्णांचे उपचार, जेवणापासून किमान मनोरंजनासाठी वायफाय आदी बाबींची  काळजी घेतली जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

सेव्हन हिल्स्चा वापर
परदेशी आणि प्रवाशांच्या विलगीकरणासाठी मुंबईतील पूर्वीच्या सेव्हन हिल्स् रूग्णालयाच्या इमारतीत अद्ययावत व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. सध्या ४०० खाटांची क्षमता असून लवकरच ती एक हजारपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अन्यथा कडक कारवाई
कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा संसर्गजन्य रोग असला तरी रोग प्रतिकारक्षमतेच्या जोरावर तो रोखता येऊ शकतो. त्यासाठी शासनाने , डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. साथ प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून आवश्यक तिथे कठोर कारवाईचा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

आणखी बातम्या...

Coronavirus : MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारकडून सूचना, आरोग्यमंत्र्यांची माहिती

CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार

Coronavirus : नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा

Corona virus : Coronaच्या संक्रमणादरम्यान व्हायरल झाली 'ही' शॉर्ट फिल्म, पाहून धक्काच बसेल!

 

Web Title: Coronavirus : In a couple of days, the laboratories will be enhanced, KEM will also be tested - Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.