CoronaVirus News: दहिसरच्या इस्पितळात साकारले कोविड केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:52 AM2020-06-18T01:52:15+5:302020-06-18T01:52:24+5:30

पाच वर्षे होते बंद : रुग्णांना मिळाला दिलासा

CoronaVirus covid Kendra at Dahisar Hospital | CoronaVirus News: दहिसरच्या इस्पितळात साकारले कोविड केंद्र

CoronaVirus News: दहिसरच्या इस्पितळात साकारले कोविड केंद्र

Next

मुंबई : गेली पाच वर्षे बंद असलेल्या पालिकेच्या दहिसरच्या इस्पितळात ४६ बेडचे सुसज्ज कोविड केंद्र उभे राहिल्याने येथील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहिसर पश्चिम येथील रुस्तुमजी शाळेजवळील रंगनाथ केसकर रोडवर पालिकेच्या पाच मजली इमारतीत हे कोविड केंद्र साकारले आहे. येथे पालिकेचे प्रभाग कार्यालय उघडण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता.

एकीकडे पालिकेच्या आर उत्तर वॉर्डमध्ये कोविडचे रुग्ण वाढत असताना, येथील नागरिकांना इस्पितळाची कमतरता भासत होती. दहिसर विभागात सध्या १३ दिवसांनी कोरोनाचा रेट दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथे उभारलेल्या नव्या कोविड केंद्रामुळे येथील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नगरसेवक म्हणून आपण येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करत होतो. खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडे या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली. २२ मे रोजी त्यांनी या रुग्णालयात भेट दिली. येथील जागेत प्रभाग कार्यालय उघडण्यास त्यांनी विरोध केला आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या बंद इस्पितळात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सोशल मीडियावर या बंद हॉस्पिटलचा व्हिडीओ जारी करून याला वाचा फोडली. त्यांनी पालिका आयुक्तांशी व उपायुक्त विश्वास शंकरराव व आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी करीत पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येऊन येथे सुसज्ज कोविड इस्पितळ उभे राहिले, अशी माहिती नगरसेवक हरीश छेडा यांनी ‘लोकमत’ला दिली.

खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते या कोविड इस्पितळाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार मनीषा चौधरी, उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर, नगरसेवक हरीश छेडा, जगदीश ओझा आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अथक प्रयत्नांना आले यश
खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापालिका आयुक्तांशी व उपायुक्त विश्वास शंकरराव व आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी करीत पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येऊन येथे सुसज्ज कोविड इस्पितळ उभे राहिले अशी माहिती नगरसेवक हरीश छेडा यांनी ‘लोकमत’ला दिली. नुकतेच शेट्टी यांच्या हस्ते या कोविड केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी या विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus covid Kendra at Dahisar Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.