Join us

CoronaVirus: धोका वाढला! उपनगरात बाधित इमारती, मजल्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 2:11 AM

CoronaVirus: मुंबईत एकूण १० हजार ९४६ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या होत्या. यापैकी चार हजार ८५९ इमारती व मजले बाधित क्षेत्राचा यादीतून वगळण्यात आले आहेत.

मुंबई : पश्चिम उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने गेल्या सहा दिवसांत प्रतिबंधित इमारती अथवा मजल्यांचा आकडा एक हजाराने वाढला आहे. १६ जून रोजी मुंबईत एकूण चार हजार ८५९ इमारती प्रतिबंधित होत्या. मात्र २२ जून रोजी प्रतिबंधित इमारती व मजल्यांचा आकडा पाच हजार ९५१ वर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण १० हजार ९४६ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या होत्या. यापैकी चार हजार ८५९ इमारती व मजले बाधित क्षेत्राचा यादीतून वगळण्यात आले आहेत.मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबंधित परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत होता. यामुळे एप्रिल महिन्यात मुंबईतील एकूण बाधित क्षेत्रांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुधारित धोरण आणून बाधित रुग्ण सापडलेल्या इमारती अथवा मजला प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एका परिसरात जास्त रुग्ण सापडले तरच तो परिसर सील केला जात आहे. मात्र मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, मुलुंड, भांडुप या परिसरात गेल्या आठवड्याभरात रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रतिबंधित इमारती व मजल्यांची संख्याही वाढल्याचे दिसून येत आहे. या विभागांमध्ये आता मिशन झीरो ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत ५० मोबाइल क्लिनिकल गाड्या बाधित क्षेत्रांमध्ये फिरून संशयित लोकांची तपासणी करणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित संशयित रुग्णाची कोरोना चाचणी तत्काळ केली जाणार आहे.>आता इमारतींमध्ये वाढले रुग्णआतापर्यंत झोपडपट्टी भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते. मात्र जास्तीतजास्त लोकांची तपासणी, संस्थात्मक विलगीकरण आणि तत्काळ उपचार यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले आहे. परंतु आता मुंबईतील इमारतींमध्ये रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात येत आहेत.