Join us

CoronaVirus News: हे मुंबईतलं केईएम रुग्णालय आहे; नितेश राणेंकडून 'तो' फोटो ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:49 PM

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईतील रुग्णालयांमधील परिस्थिती गंभीर

मुंबई: एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना दुसरीकडे रुग्णालयांमधील परिस्थिती गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणेंनी मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालयातील वॉर्डमोरील जागेत अनेक मृतदेह ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. हे मुंबईतलं केईएम रुग्णालय आहे, असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शहरांच्या यादीत मुंबईचा पहिला क्रमांक आहे. मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा ३२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. शहरात आतापर्यंत १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं शहरातल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. मुंबईतल्या शासकीय रुग्णालयांमधील व्हिडीओ, फोटो शेअर करून भाजपा नेते महाविकास आघाडी सरकारवर आणि विशेषत: शिवसेनेवर टीका करत आहेत. नितेश राणेंनी याआधीही पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचे व्हिडीओ ट्विट केले आहेत. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील काही दिवसांपूर्वीच पालिका रुग्णालयातून कोरोना रुग्ण पळून जात असतानाचा व्हिडीओ ट्विट करत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानीतेश राणे