CoronaVirus: एमटीएनएलचं बिल भरण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 08:45 PM2020-04-03T20:45:45+5:302020-04-03T20:47:07+5:30

महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)  च्या ग्राहकांना लँडलाइन व मोबाइलचे मार्च महिन्याचे बिल भरण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

CoronaVirus: Deadline to pay MTNL bills by April 20 | CoronaVirus: एमटीएनएलचं बिल भरण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदतवाढ 

CoronaVirus: एमटीएनएलचं बिल भरण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदतवाढ 

Next

मुंबई : महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)  च्या ग्राहकांना लँडलाइन व मोबाइलचे मार्च महिन्याचे बिल भरण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी बिल भरण्यासाठी बाहेर निघू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होमद्वारे काम करणाऱ्या नागरिकांना इंटरनेट जास्त प्रमाणात लागत असल्याने एमटीएनएलने सर्व पोस्टपेड मोबाइल धारक व ब्रॉडबँड ग्राहकांना इंटरनेट वापराची मर्यादा वाढवून दिली आहे. ग्राहकांना रिचार्ज अथवा नवीन योजनेबाबत वेबसाइटच्या माध्यमातून माहिती व सेवा पुरवली जात आहे.

Web Title: CoronaVirus: Deadline to pay MTNL bills by April 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.