coronavirus : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजारांवर, 125 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 08:57 PM2020-04-18T20:57:34+5:302020-04-18T20:58:41+5:30

आज पुन्हा एकदा मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.

coronavirus: The death toll in Mumbai's corona virus stands at two and a half thousand, 125 people death BKP | coronavirus : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजारांवर, 125 जणांचा मृत्यू

coronavirus : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजारांवर, 125 जणांचा मृत्यू

Next

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा घटत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा एकदा मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत आज दिवसभरात एकूण 87 नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 2 हजार 509 वर पोहोचला आहे. 

आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत आज कोरोनाचे 87 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकदा 2 हजार 509 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात मुंबईमध्ये एकूण चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 125 वर पोहोचला आहे. तर उपचारानंतर बरे झालेल्या 42 रुग्णांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

तर राज्याचा विचार घेतल्यास एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 648 वर पोहोचला आहे. आज राज्यात एकूण 328 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 211 वर पोहोचला आहे.  

Web Title: coronavirus: The death toll in Mumbai's corona virus stands at two and a half thousand, 125 people death BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.