Maharashtra Delta Plus: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे ५ जणांचा मृत्यू; ६६ जणांना लागण, राज्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 12:41 PM2021-08-14T12:41:39+5:302021-08-14T12:42:18+5:30

राज्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटचे आतापर्यंत ६६ रुग्ण आढळून आले आहेत. यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus Delta Plus variant cases are increasing rapidly in Maharashtra so far 66 cases have been reported 5 deaths | Maharashtra Delta Plus: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे ५ जणांचा मृत्यू; ६६ जणांना लागण, राज्यात खळबळ

Maharashtra Delta Plus: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे ५ जणांचा मृत्यू; ६६ जणांना लागण, राज्यात खळबळ

Next

राज्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटचे आतापर्यंत ६६ रुग्ण आढळून आले आहेत. यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे यातील काही रुग्णांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. राज्यातील विविध ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसिंग चाचणीत डेल्टा प्लस व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रत्नागिरी, रायगड आणि बीडमध्ये शुक्रवारी डेल्टा प्लस व्हेरिअंटची लागण झालेल्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus Delta Plus variant cases are increasing rapidly in Maharashtra so far 66 cases have been reported, 5 deaths)

डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे आतापर्यंत रत्नागिरीत दोन, मुंबई, रायगड आणि बीडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये तीन पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचं वय हे ६५ वर्षांहून अधिक होतं. यातील दोन जणांनी तर कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले होते. तर दोघांनी एक डोस घेतला होता. पाचव्या मृत्यूच्या लसीकरणाबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. 

चिंतेचं कारण नाही
गेल्या आठवड्याभरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंट रुग्णांचा आकडा २१ वरुन ६६ वर पोहोचला आहे. यातील काही रुग्ण जून महिन्यातील आहेत. ज्यांच्या जीनोम सिक्वेंसिंगचा अहवाल आता आला आहे. ज्यांना आधीपासूनच विविध आजारांनी ग्रासलेलं आहे अशांचाच डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाबरणाची कोणतीही गरज नाही. डेल्टा एक घातक व्हेरिअंट आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यापद्धतीनं काळजी बाळगली पाहिजे, असं डॉ. प्रदिप अवाटे यांनी सांगितलं. 

Read in English

Web Title: Coronavirus Delta Plus variant cases are increasing rapidly in Maharashtra so far 66 cases have been reported 5 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.