Join us

Coronavirus: डॉक्टरांकडून पीपीई कीटची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 5:20 AM

काही खाजगी विक्रेते महापालिका दवाखान्यांमध्ये येऊन पीपीई कीट मिळतील पण जास्त पैसे द्यावे लागतील अशा ऑफर देत फिरत असल्याच्या तक्रारी

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना डॉक्टर, नर्स यांना पीपीई कीट उपलब्ध नाहीत, तर काही खाजगी विक्रेते महापालिका दवाखान्यांमध्ये येऊन पीपीई कीट मिळतील पण जास्त पैसे द्यावे लागतील अशा ऑफर देत फिरत असल्याच्या तक्रारी आहेत.ज्या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण आहेत. तेथे पीपीई कीट आणि मास्क वापरावेत, असे केंद्राचा प्रोटोकॉल सांगतो. मात्र नॉन कोविड विभागात आलेला पेशंट कोरोना बाधित आहे की नाही हे त्याला तपासल्याशिवाय, त्याची लक्षणे पाहिल्याशिवाय कळणार कसे? जर त्याला पीपीई कीट न घालता डॉक्टरने तपासले आणि तो कोरोना बाधित आहे हे लक्षात आले तर तपासणाऱ्या डॉक्टरला क्वारंटाईन होण्याचा सल्ला देणे म्हणजे स्वत:हून डॉक्टरांची संख्या कमी करत जाणे आहे. त्यापेक्षा पीपीई कीट का देत नाहीत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.याबाबत मार्डचे हंगामी अध्यक्ष डॉ. दीपक मुंडे यांनी सांगितले की, चार तासाला एक असे दोनवेळा पीपीई कीट दिले तर निदान लघुशंका आणि नैसर्गिक विधीसाठी डॉक्टर्स, नर्सेसना जाता येईल. पण हेच पीपीई कीट जपून वापरा असे सतत सांगितले जात आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, कीट ही नियमित बनवली जाणारी वस्तू नसल्याने सुरुवातीला त्याची टंचाई होती. आता आपण सांगली, नागपूर, पुणे व मुंबईतील काही कंपन्यांना कामे दिली आहेत. या कंपन्या रोज ५० ते ५२ हजार कीट बनवत आहेत. शिवाय केंद्र सरकारकडूनही कीट येत आहेत.खासगी डॉक्टरांना आम्ही कुठे व कोणत्या दराने हे किट मिळतील याची माहिती दिली आहे. त्यांना काही अडचण असेल तर ते आमच्याशी संपर्क साधू शकतात.- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या