coronavirus: अत्यावश्यक सेवेस नकार; एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:14 AM2020-05-15T00:14:01+5:302020-05-15T00:14:27+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे. सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेºयांद्वारे १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणा-या कर्मचाºयांची ने-आण करण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरवणाºया एसटीला मुंबई विभागात कर्मचाºयांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मुंबईत चालक, वाहक कमी पडत असल्याने रायगड व रत्नागिरी विभागातून ५० चालक, वाहकांना मुंबई विभागासाठी बोलाविण्यात आले आहे. मात्र जे कर्मचारी कंटेनमेंट झोन वगळून मुंबईमध्ये उपलब्ध असूनही कर्तव्यावर येण्यास नकार देत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी शक्यता एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वर्तवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे. सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेºयांद्वारे १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचा-यांची ने-आण करण्यात येत आहे. त्यासाठी दररोज ४०० एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी, पर्यवेक्षक व अधिकारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत. मात्र काही जण कामावर येत नसल्याने कंटेनमेंट झोन वगळता मुंबई व परिसरात राहणाºया कर्मचाºयांना कामावर रुजू होण्याबाबत कळविण्यात आले होते.
काहींची त्यांच्या घरापासून म्हणजेच नाशिक, धुळे, शिरपूर, सातारा या ठिकाणावरून कामाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी वाहनांचीदेखील व्यवस्था करण्यात आली. तरीही कर्मचारी कामावर रुजू होण्यास नकार देत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एका परिपत्रकाद्वारे एसटी महामंडळातील संबंधितांनी दिल्याचे समजते. त्यानुसार, एकाच ठिकाणी ३ वर्षांपेक्षा जास्त काळ काम करीत असलेल्या व कामावर रुजू होण्यास दिरंगाई करणाºया कामगार व पर्यवेक्षकांना निलंबित करणे, त्यांच्या बदल्या करणे, अशा प्रकारची शिक्षा केली जाऊ शकते, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.