Join us

Coronavirus: कोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:22 PM

धारावी येथे एकूण १ हजार ५४१ कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी ४५३ पूर्णपणे बरे झाले आहेत. येथे कोरोना दुप्पटीचा दर  आता ३ दिवसांवरून १९ दिवसांवर आला आहे

ठळक मुद्देकोरोनाची दुप्पट वाढ आणि सरासरी वाढीचा दर देखील कमी झाला आहे.लोकांना घराबाहेर पडू दिले नाही, परंतु घरापर्यंत मदत पोहचवलीमुंबईला रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी धारावीची मुख्य भूमिका

मुंबई – शहरात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाचं कारण सर्वात मोठी झोपडपट्टी भाग धारावीला मानलं जातं आहे. याठिकाणी कोरोनाचे एकूण १ हजार ५४१ रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरात दाट लोकसंख्येमुळे सामाजिक अंतरांचे पालन आणि स्वच्छता यासारख्या अनेक आव्हानांचा सामना प्रशासनाला करावा लागत असे. धारावीसह आसपासचे परिसरही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र दिलासा देणारी बाब अशी की, आता धारावीतील कोरोना प्रकरणांमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. बुधवारी एका दिवसात किमान १८ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, कोरोनाची दुप्पट वाढ आणि सरासरी वाढीचा दर देखील कमी झाला आहे.

धारावी येथे एकूण १ हजार ५४१ कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी ४५३ पूर्णपणे बरे झाले आहेत. येथे कोरोना दुप्पटीचा दर  आता ३ दिवसांवरून १९ दिवसांवर आला आहे, तर संपूर्ण मुंबईत हा दर ११ दिवसांचा आहे. जर अशी स्थिती असेल तर धारावीत देखील डी वॉर्ड (वरळी, लोअर परेल) सारखी सुधारणा पाहायला मिळेल. २१ मे पर्यंत ८१२ रुग्ण होते त्यापैकी ४१० बरे झाले आहेत.

धारावीमध्ये आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर मुंबईच्या जी वॉर्डात एकूण २ हजार ७७ कोरोना रुग्ण आहेत. या प्रभागात दादर, माहीम, धारावी असे भाग आहेत. जी वॉर्डातील कोरोनाचा सरासरी दर ५.१ टक्क्यांपर्यंत खाली आला असून गेल्या सात दिवसांत कोरोना संक्रमण लक्षात घेता त्याचे मूल्यांकन केले गेले आहे. तर मुंबईतील कोरोनाचा सरासरी विकास दर ६% आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल हे दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीच्या तज्ज्ञ टीमसमवेत धारावी येथे होते. लॉकडाऊन संपण्यासाठी मुंबईला रेड झोनमधून बाहेर पडावे लागेल यात काही शंका नाही आणि त्यासाठी धारावीतील कोरोना प्रकरणांची संख्या स्थिर करावी लागेल असं त्यांनी सांगितले.

धारावीतील पहिला रुग्ण १ एप्रिल रोजी आढळून आला. १५ एप्रिलपर्यंत येथे १०० कोरोनाग्रस्त आढळले. २७ एप्रिल ते १५ मे या कालावधीत जी उत्तर वॉर्डात ९५ रुग्ण आढळले, त्यातील बहुतेक झोपडपट्टीतील. आता हा सरासरी दर २५ वर आला आहे. प्रभागचे अतिरिक्त आयुक्त किरण दिघावकर म्हणाले, अधिकाधिक तपास हा त्यामागील मोठा घटक आहे. खासगी डॉक्टर आणि रुग्णालये देखील बीएमसीसह पुढे आली आणि त्यांनी खूप मदत केली. आम्ही झोपडपट्टी भागात साडेचार लाख लोकांची तपासणी केली. २४ खासगी डॉक्टरांनी डोअर टू डोर स्क्रीनिंग केले. त्यांनी ५० हजार लोकांची स्क्रिनिंग केली आणि एक पैसाही घेतला नाही.

धारावी येथे २ हजार ४०० हून अधिक आरोग्यसेवा कर्मचारी आहेत, त्यापैकी २७ खासगी डॉक्टर, २९ परिचारिका, ६८ वॉर्ड बॉय आणि ११ को-ऑर्डिनेटर आणि दोन फार्मासिस्ट आहेत. या व्यतिरिक्त या भागातील गरजू लोकांना जेवणाची सोय केली. आम्ही लोकांना घराबाहेर पडू दिले नाही, परंतु घरापर्यंत मदत पोहचवली. स्वयंसेवी संस्थेने आतापर्यंत २३ हजार अन्न पॅकेजेस दान केली आहेत अशी माहिती दिघावकर यांनी दिली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

तणाव वाढला! भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा

छत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…

भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम!

कोरोनाची दहशत! ‘या’ घोड्याला होम क्वारंटाईन करण्याचे कुटुंबाला आदेश, कारण...

योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या