Join us

Coronavirus: कोरोना संकटकाळात पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 4:19 PM

रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारे वेलमॅनचे ४० हजार युनिट्स आणि वेलवुमेनच्या ६ हजार युनिट्सचे वाटप कंपनी करणार आहे.

मुंबई - जगभरात कोविड-१९ महामारीचे संकट वाढत असताना आपल्‍यापैकी अनेकांनी घरात राहत घरातूनच काम करण्‍याच्‍या नवीन नियमांशी जुळवून घेतले आहे. पण ही सोय सर्वांनाच अनुभवता येत नाही. आज जवळपास ६५ दिवस झाले आहेत, आपल्‍या शहरातील धाडसी पुरूष व महिलांचा समावेश असलेले पोलिस दल कोविड-१९ च्या प्रादुर्भावाविरोधात लढण्‍यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. कोरोनाशी या अदृश्‍य युद्धामध्‍ये ते अग्रस्‍थानी आहेत.

पोलिसांना या विषाणूचा संसर्ग होण्‍याचा सर्वाधिक धोका देखील आहे. रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मेयेर व्हिटाबायोटिक्‍सने रोहित शेलटकरच्या ग्रॅण्‍ड मराठा फाऊंडेशनसोबत सहयोगाने त्‍यांना वेलमॅन, वेलवुमन आणि अल्‍ट्रा डी३ अशी रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारी सप्‍लीमेण्‍ट्स देण्‍याकरिता पुढाकार घेतला आहे.  वेलमॅन हे रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी, पुरूषांच्‍या एकूण आरोग्‍यासाठी वैज्ञानिकदृष्‍ट्या सुत्रीकरण करण्‍यात आलेल्या गोळ्या आहेत. तसेच वेलवुमन हे महिलांचे आरोग्‍य व रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी खास तयार करण्‍यात आले आहे.

रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारे वेलमॅनचे ४० हजार युनिट्स आणि वेलवुमेनच्या ६ हजार युनिट्सचे वाटप कंपनी करणार आहे. तसेच संपूर्ण दलाला अल्‍ट्रा डी ३ जीवनसत्त्व ड चे ४६ हजार पॅक्‍सचे देखील वाटप करणार आहे. याबाबत मेयेर व्हिटाबायोटिक्‍सचे उपाध्‍यक्ष रोहित शेलटकर म्‍हणाले की, या महामारीविरोधात लढण्‍यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्‍या आपल्‍या मुंबई पोलिस दलाला साह्य करणे हे आमच्‍यासाठी अत्‍यंत सौभाग्‍यपूर्ण आहे. वेलमॅन व वेलवुमन टॅब्‍लेट्स वैज्ञानिकदृष्‍ट्या संशोधन करण्‍यात आले आहेत आणि या टॅब्‍लेट्समधून रोगप्रतिकार शक्‍ती वाढत असल्‍याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभं राहून जनतेची सेवा करत आहेत त्यामुळे अशा धाडसी पोलिसांना बळ देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस