Join us

Coronavirus: कोरोनावर मात करण्यासाठी श्वानही करताहेत व्यायाम; वेळोवेळी तपासणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 3:24 AM

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ विभागात डॉबरमन, स्निपर या जातीचे श्वान आहेत

कुलदीप घायवटमुंबई : कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर पडले आहे. कोरोनाचे परिणाम अनेक देशांतील प्राण्यांवर होताना आढळून आले आहेत. त्यामुळे पाळीव प्राण्यांची काळजी घेतली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे रेल्वे सुरक्षा बलाचे श्वान पथक लॉकडाउन काळात विश्रांतीवर आहे. मात्र कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी श्वानांचा दररोज व्यायाम सुरू आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ विभागात डॉबरमन, स्निपर या जातीचे श्वान आहेत. प्रवाशांची सुरक्षा, विस्फोटक, अंमली पदार्थांचा गंध घेऊन शोध घेणे, स्थानकावर गस्त घालणे अशी दररोजची कामे हे श्वान करत होते. मात्र उपनगरीय रेल्वे, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस अशी प्रवासी सेवा बंद आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर होणारी लाखोंच्या संख्येची गर्दी शून्यावर आली आहे.

त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील श्वान पथक विश्रांतीवर आहे. कोरोनाचा धोका पाळीव प्राण्यांना होऊ शकतो. यासह जास्त विश्रांती करून श्वानाचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे दररोज व्यायाम करणे, विस्फोटकाचा गंध घेणे, स्थानकावर फेरफटका मारणे अशी दिनचर्या सुरू आहे.मुंबई विभागातील श्वान पथक सध्या विश्रांती करत आहेत. त्यांची शरीरबांधणी योग्य राहावी, यासाठी व्यायाम करणे सुरू आहे. - अश्रफ के. के, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वेप्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांच्या सामग्रीची तपासणी, पेट्रोलिंंग करणे अशी कामे बंद आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील श्वान पथकाचे सध्या कर्तव्य नाही. मात्र फेरफटका मारण्यासाठी ते स्थानकावर येतात. त्यांचे ट्रेनिंग नियमित सुरू आहे. - विनीत खरब, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वेयोग्य प्रकारे स्वच्छता केली जातेकोरोनाच्या काळात श्वानांची योग्य ती काळजी घेतली जाते. श्वानाचे पंजे साफ करणे, केस कापणे, आवश्यकता असल्यास निर्जंतुकीकरणाची फवारणी करणे सुरू आहे. ग्रुमिंग (स्वच्छता) करणे, फ्लेम गनने स्वच्छ करणे, आवश्यकतेनुसार आहार दिला जातो. त्यानंतर विश्रांती दिली जाते.फिजिकल डिस्टन्स पाळला जातोफिजिकल डिस्टन्स महत्त्वाचा नियम आहे. हा नियम श्वानदेखील पाळत आहेत. प्रत्येक श्वानांमध्ये साधारण दोन मीटरचे अंतर ठेवले जाते. आहार घेतानादेखील हे अंतर कायम ठेवले जाते. श्वानांचा इतर बाहेरील लोकांशी संपर्क येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या