coronavirus : वांद्रेतील घटनेला जातीय रंग देऊ नका, संजय राऊतांनी कपिल मिश्रांना दिला दम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 08:28 PM2020-04-15T20:28:56+5:302020-04-15T20:33:21+5:30

कपिल मिश्रांसारखे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही ऐकत नाहीत. ते वांद्रे येथे झालेल्या दुर्दैवी घटनेला जातीय रंग देत आहेत

coronavirus: Don't give communal color to incident in Bandra - sanjay raut BKP | coronavirus : वांद्रेतील घटनेला जातीय रंग देऊ नका, संजय राऊतांनी कपिल मिश्रांना दिला दम

coronavirus : वांद्रेतील घटनेला जातीय रंग देऊ नका, संजय राऊतांनी कपिल मिश्रांना दिला दम

Next
ठळक मुद्देकपिल मिश्रा हे वांद्रे येथे झालेल्या गर्दीच्या प्रकरणाला जातीय रंग देत असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी कपिल मिश्रासारख्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजेलॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा झाल्यानंतर वांद्रे येथे परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी उसळली होती

मुंबई - मंगळवारी मुंबईतील वांद्रे परिसरात गावी जाण्यासाठी जमलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मुद्यावरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि केंद्रात सत्ता असलेला भाजपा आमनेसामने आले आहेत. एकीकडे वांद्रे येथे काल झालेल्या गर्दीसाठी भाजपाला दोष देण्यात येत आहे. तर भाजपाने या गर्दीचे खापर राज्यातील सत्ताधारी शिवसेनेवर फोडले आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी वांद्रे येथे झालेल्या गर्दीवरून दिल्लीतील भाजपा नेते कपिल मिश्रा यांना दम दिला आहे. 

 कपिल मिश्रा हे वांद्रे येथे झालेल्या गर्दीच्या प्रकरणाला जातीय रंग देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, 'कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. मात्र कपिल मिश्रांसारखे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही ऐकत नाहीत. ते वांद्रे येथे झालेल्या दुर्दैवी घटनेला जातीय रंग देत आहेत. मुंबई पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे.'

भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून वांद्रे येथील घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. 'तीन कटू प्रश्न, जर ही गर्दी गावी जाणाऱ्या मजुरांची होती तर  यापैकी कुणाकडेच मोठ्या बँगा, पिशव्या आदी सामान का नव्हते? ही गर्दी जामा मशिदीसमोरच का झाली? तसेच महाराष्ट्रात आधीच लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले होते. मग आज गोंधळ का झाला? हे कारस्थान होते का?' अशी शंका कपिल मिश्रा यांनी व्यक्त केली होती. 

काल देशभरातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर वांद्रे येथे परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी उसळली होती. आपल्याला गावी जाऊ द्यावे अशी मागणी जमावाकडून करण्यात येत होती.  या गर्दीमुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरीस पोलिसांनी या जमावाला पांगवले होते.

Web Title: coronavirus: Don't give communal color to incident in Bandra - sanjay raut BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.