Coronavirus: लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत! राज्यात रुग्ण वाढल्याने खबरदारी; बंधने कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:28 AM2020-06-30T02:28:29+5:302020-06-30T02:28:59+5:30

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतील.

Coronavirus: Due to increasing patient state Lockdown till July 31! Restrictions will remain | Coronavirus: लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत! राज्यात रुग्ण वाढल्याने खबरदारी; बंधने कायम राहणार

Coronavirus: लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत! राज्यात रुग्ण वाढल्याने खबरदारी; बंधने कायम राहणार

Next

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांहून अधिक तर मृत्यूची संख्या ७ हजारांवर गेल्याने सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला असून काही नवीन बंधने टाकली आहेत. सरकारी व खासगी कार्यालयांमधील आधीचीच उपस्थिती कायम ठेवली असून, बिगर अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ कमी केली आहे. तसेच घराजवळच पायी फिरा किंवा व्यायाम करा अशी सक्ती केली आहे.

राज्य सरकारने 'मिशन बिगन अगेन' अंतर्गत आधीच्या बऱ्याच सवलती कायम राहतील, असे सोमवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. आता अधिक सवलती दिल्या जातील असा अंदाज होता. सरकारने तशी तयारी केलीही होती. परंतु गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने बंधने कायम ठेवताना, काही नवे निर्बंध घातले आहेत.

स्थानिक प्रशासनाला अधिकार
रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतील. एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसेच कार्यालयात जाणाऱ्यांना दूरचा प्रवास करता येईल. खरेदीसाठी केवळ जवळच्या बाजारात जाता येईल.

ठाणे शहरात पुन्हा लॉकडाऊन
ठाणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या लॉकडाउनप्रमाणेच तिथे सर्व गोष्टींवर निर्बंध लागू होतील.

ठाण्यावर मुख्यमंत्री नाराजी
कोरोना रुग्णवाढीवर नियंत्रणासाठी ठाण्यातील वरिष्ठ अधिकाºयांनी सोमवारी बैठक घेऊन २ ते ११ जुलैदरम्यान कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला खरा; पण सायंकाळी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करताच तो बदलण्याची भूमिका वरिष्ठ अधिकाºयांनी घेतली. आता कंटेनमेंट झोनमध्येच लॉकडाऊनची शक्यता आहे. त्याचे नेमके स्वरुप मंगळवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.

असे आहेत निर्बंध

  • आंतरजिल्हा वाहतूक बंदच.
  • हॉटेल बंद, मात्र घरपोच सेवा सुरू
  • अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत. अन्य वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत
  • घरानजीकच पायी चाला व सार्वजनिक मैदानांवर व्यायाम करा
  • मुंबईत लोकल फक्त अत्यावश्यक सेवांसाठी.
  • सरकारी कार्यालयातील उपस्थिती १५% किंवा १५ व्यक्तींपर्यंत
  • मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महापालिकांमध्ये आता केवळ नोकरदारांनाच ये-जा शक्य
  • लग्न आणि अंत्यविधीसाठी ५० जणांनाच परवानगी
  • दारूची दुकाने पूर्वीसारखी सुरू. दारू ऑनलाईनही घेता येईल.

Web Title: Coronavirus: Due to increasing patient state Lockdown till July 31! Restrictions will remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.