Join us

Coronavirus : ग्राहकांना सोशल डिस्‍टन्सिंग ठेवण्‍याचे आवाहन; वीज कंपन्यांही सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 1:29 PM

Coronavirus : कोरोना व्‍हायरससंदर्भात जारी केलेल्‍या सूचनेनंतर वीज कंपन्यांनी आपल्‍या ग्राहकांना घरामध्‍येच राहत डिजिटल पेमेंट्स मोड्स सुविधेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले

मुंबई- केंद्र व राज्‍य सरकारने महामारी कोरोना व्‍हायरससंदर्भात जारी केलेल्‍या सूचनेनंतर वीज कंपन्यांनी आपल्‍या ग्राहकांना घरामध्‍येच राहत डिजिटल पेमेंट्स मोड्स सुविधेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले आहे. ग्राहक घरामध्‍येच राहून सोशल डिस्‍टन्सिंग राखतील, या खात्रीसाठी अदानी या वीज कंपनीने सोसायटीमध्‍ये सेल्‍फ-हेल्‍प पेमेंट्स किओस्‍क, ड्राप बॉक्‍सेसची सुविधा दिली आहे. महाराष्‍ट्र विद्युत नियामक महामंडळाला कोरोना आजाराच्‍या परिणामांचे निर्मूलन करण्‍यासाठी हाती घेण्‍यात येणा-या उपक्रमांबाबत देखील कळवले आहे.

 कोरोना व्‍हायरसमुळे सेवा निलंबित होणे, मूदतीपूर्वीच सेवा खंडित होणे, युटिलिटी कट-ऑफ्स याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आणि अदानीकडे पुरवठा सुधार करण्‍यासंदर्भात आणि सुरक्षा संबंधित तक्रारी केल्‍या जात आहेत. ग्राहक अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून बिलसंदर्भात माहिती प्राप्‍त करू शकतात आणि १८००५३२९९९८ क्रमांकावर मिस्‍ड कॉल देत नो सप्‍लाय तक्रारींची नोंद करू शकतात. तसेच ग्राहक पेटीएम, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोनप, बीएचआयएम, मोबिक्विक आणि फ्रीचार्ज अशा ऑनलाइन पेमेण्‍ट मोड्सच्‍या माध्‍यमातून बिल देयके भरू शकतात. ग्राहक व कर्मचा-यांच्‍या सुरक्षिततेसाठी मीटर रिडिंग, बिलिंग, बिल कलेक्‍शन, नवीन कनेक्‍शन्‍स जोडणी अशा मानवी इंटरफेससह इतर सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत खंडित करण्यात आल्‍या आहेत.

 टाटा पॉवर देखील वीज ग्राहक यांच्यासाठी लागणारी सेवा ऑनलाईन देत आहे. सरकारने जे आदेश दिले आहेत; ते सगळे आदेश पाळले जात आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. 

 या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना देण्यात आली आहे.

 ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर बिलसंबंधीचे एसएमएस द्वारे संदेश पाठविण्यात येईल.

महावितरणला थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ‘…तेव्हाही रेल्वे बंद केली नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या’

Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन'

Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटला पोहचले 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईवीज