Coronavirus: साडेतीन लाख ग्राहकांनी पाठविले वीज मीटर रीडिंग; महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:17 AM2020-05-05T02:17:59+5:302020-05-05T06:53:03+5:30

पोर्टल, मोबाइल अ‍ॅपचा वापर

Coronavirus: electricity meter readings sent by three and a half million customers; Responding to MSEDCL's appeal | Coronavirus: साडेतीन लाख ग्राहकांनी पाठविले वीज मीटर रीडिंग; महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद

Coronavirus: साडेतीन लाख ग्राहकांनी पाठविले वीज मीटर रीडिंग; महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद

googlenewsNext

मुंबई : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे मीटर रीडिंग स्वत:हून पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणने बिल दिले आहे. यामध्ये पुणे परिमंडळातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील ५८ हजार २१० वीज ग्राहकांचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाउनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीज ग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच बिलांची छपाई करणे व त्याचे वितरण बंद केले आहे.

महावितरणची www. mahadiscom.in ही वेबसाइट व ‘महावितरण’ मोबाइल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वत: रीडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रीडिंगप्रमाणे वीज वापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्यासाठी वीज ग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाइलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीज वापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रीडिंग पाठविले आहे.

येथील ग्राहकांनी घेतला पुढाकार
महावितरणकडे स्वत:हून मीटर रीडिंग पाठविलेल्या वीज ग्राहकांमध्ये पुणे परिमंडळामधील ६९९१२, कल्याण - ५८२१०, भांडुप - ३७५४३, नागपूर - २७७२०, नाशिक - २५८३१, कोल्हापूर - २२७२८, बारामती - २०९४१, जळगाव - १७६६४, औरंगाबाद - १६३७४, अकोला - १३७६७, अमरावती - १३५४०, चंद्रपूर - ८८२४, कोकण - ८५४२, नांदेड - ७३४८, गोंदिया - ७२६८ आणि लातूर परिमंडळामधील ६९६३ वीज ग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणचे आवाहन
महावितरणकडून प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाइल अ‍ॅप व वेबसाईटमध्ये लॉगइन करून दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करून रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus: electricity meter readings sent by three and a half million customers; Responding to MSEDCL's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.